एक्स्प्लोर

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

एलिझाबेथ यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मॅक्रॉन यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, नवे पंतप्रधान निवडून येईपर्यंत त्या सरकारचे अंतर्गत व्यवहार पाहतील.

Elisabeth Borne: नवी दिल्ली : फ्रान्सच्या (France) पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. 

एलिझाबेथ यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मॅक्रॉन यांच्या कार्यालयातून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, नवीन पंतप्रधान निवडून येईपर्यंत त्या सरकारचे अंतर्गत व्यवहार पाहतील. मात्र, नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात?

एलिझाबेथ यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री गॅब्रिएल अटल आणि संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेक्रोनू यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याशिवाय अर्थमंत्री ब्रुनो ले मेरे आणि माजी कृषी मंत्री ज्युलियन डीनॉर्मंडी हेही संभाव्य पर्याय असल्याचे सांगितले जात आहेत. 

एलिझाबेथ यांनी राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या युरोपियन निवडणुकांपूर्वी आपल्या सर्वोच्च संघात फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत.

मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर एलिझाबेथ यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्या या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP MajhaUddhav Thackeray BJP Special Report : मोदी-ठाकरे भेटीतील 'तो' किस्सा, सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट!Ghatkopar Hoarding Special Report : भावेश ते प्रशासन,  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला कोण कोण जबाबदार?Ghatkopar Bhavesh Bhinde Special Report : ऑफिस बॉय ते कोट्याधीश! 14 मुंबईकरांचाबळी घेणारा भावेश कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Embed widget