(Source: ECI/ABP News/ABP Majha)
French Journalist Killed : युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात फ्रेंच पत्रकाराचा मृत्यू, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची माहिती
French Journalist Killed In Ukraine : गर्व्हनर सेरही हैदाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुहान्स ओब्लास्टमध्ये झालेल्या रशियाच्या हल्यात फ्रेंच पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्याने वाहनावर गोळीबार केला.
French Journalist Killed In Ukraine : युक्रेनमधील युद्धांचं (Russia Ukraine War) कव्हरेज करताना एका फ्रेंच पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron)यांनी सोमवारी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'फ्रेडरिक लेक्लेर-इमहॉफ (Frederic Leclerc-Imhoff) हा फ्रेंच पत्रकार युक्रेनमधील युद्धाचे वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. नागरिकांसोबत एका बसमधून रशियन हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.'
⚡️Governor: French journalist killed during evacuation effort in Luhansk Oblast.
— The Kyiv Independent (@KyivIndependent) May 30, 2022
According to Serhiy Haidai, Russian forces shelled an armored evacuation vehicle, killing French reporter Frédéric Leclerc Imhoff, who was covering the effort.
📷 Serhiy Haidai/Telegram pic.twitter.com/Nzq5t3r0VX
'द कीव्ह इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, गर्व्हनर सेर्ही हैदाई यांनी माहिती दिली आहे, फ्रेंच पत्रकार लुहान्स्क ओब्लास्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नादरम्यान मृत्यू झाला. रशियन सैन्याने एका देशाबाहेर जाणाऱ्या वाहनावर गोळीबार केला. यामध्ये फ्रेंच रिपोर्टर फ्रेडरिक लेक्लेर्क इमहॉफचा मृत्यू झाला. हा पत्रकार युक्रेनमधील परिस्थितीचं वृत्तांकन करत होता. 'द कीव्ह इंडिपेंडंट'ने सेर्ही हैदाई यांच्या टेलिग्राम अकाउंटचा हवाला देत ट्विटरवर पत्रकाराचा फोटोही शेअर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या