(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine-Russia Tension : युक्रेनमध्ये स्फोट, गॅस पाइपलाइनला आग; पुन्हा तणाव वाढला
Blast in Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असणारा तणाव पुन्हा वाढला आहे. युक्रेनमध्ये एका वाहनात भीषण स्फोट झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blast in Ukraine : रशिया आणि युक्रेनमधील तणाव अद्यापही निवळला नाही. युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा रशियाने केल्यानंतरही तणावात कमी झाल नाही. शुक्रवारी पूर्व युक्रेनमध्ये एका वाहनात मोठा स्फोट झाला. हा स्फोट पूर्व युक्रेनच्या डोनेट्स्क शहरात झाली. या ठिकाणी रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांचे नियंत्रण आहे. स्फोट झालेली कार ही विभागीय सुरक्षा अधिकारी डेनिस सिनेंकोव यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पूर्व युक्रेनमध्ये गॅस पाइपलाइनच्या एका भागाला आग लागली असल्याची घटना समोर आली आहे.
युक्रेनवर हल्ला की रशियाचा कट?
या स्फोटाबाबत अधिक माहिती समोर आली नाही. रशिया युक्रेनवर फॉल्स फ्लॅगनुसार हल्ला करू शकतो. फॉल्स फ्लॅग म्हणजे एखादा देश स्वतःच्याच भूभागावर हल्ला करतो आणि नंतर इतर कोणत्याही देशावर आरोप करतो. मग त्या हल्ल्याच्या प्रत्त्युत्तरात हल्ला करतो.
रशिया-युक्रेनमध्ये तणाव वाढल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशिया फॉल्स फ्लॅगनुसार युक्रेनवर हल्ला करेल असा असा इशारा दिला होता. कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेसाठी रशियाने युक्रेनला जबाबदार ठरवले आहे. युक्रेन लवकरच हल्ला करणार असल्याचे रशियाने म्हटले. मात्र, रशियाचा हा दावा युक्रेनने फेटाळून लावला.
अमेरिकेचा रशियाला इशारा
दरम्यान, याआधी अमेरिकेने रशियाला इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो असे म्हटले होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन युक्रेनच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली असल्याचे बायडेन यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ukraine-Russia Conflicts : युक्रेन भोवतीचे रशियन सैन्य मागे परतले, रशियन संरक्षण मंत्रालयाची माहिती
- पुतीन यांच्याशी चर्चा नाही, काही दिवसांत रशिया युक्रेनवर हल्ला करणार, अमेरिकेचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha