Viral News: फ्रान्समध्ये का सुरू आहे महिलांचे टॉपलेस आंदोलन? व्हायरल व्हिडीओची जगभर चर्चा
Paris Women Go Topless: फ्रान्समध्ये आज फेमेन या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी टॉपलेस आंदोलन केलं. त्यासंबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (Paris) रविवारी फेमेन (FEMEN) या स्त्रीवादी संघटनेच्या पाच महिला कार्यकर्त्यांनी टॉपलेस आंदोलन करुन गर्भपात (France Abortion Law) आणि इच्छामरणाच्या विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध केला. यानंतर या फेमेन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांना सोडण्यात आलं. पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये गर्भपातासंबंधित एक विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. या विधेयकाला फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
फ्रान्सच्या संविधानात गर्भपाताचा समावेश करण्याची मागणी
फेमेन (FEMEN) या संघटनेच्या वतीनं 22 जानेवारी रोजी 'मार्च फॉर लाइफ' आंदोलनाचे आयोजन केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी फ्रेंच संविधानात गर्भपाताचा (France Abortion Law) समावेश करण्याची मागणी केली होती. फ्रान्सच्या सिनेटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी गर्भपात विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. या विधेयकाला फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
France Abortion Law: गर्भपाताच्या विरोधात मोर्चा
फेमेन ही फ्रान्समधील स्त्रीवादी संघटना आहे, या संघनटेने गर्भपाताला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी केली आहे. 22 जानेवारी रोजी, हजारोंच्या जमावाने पॅरिस शहरात गर्भपात आणि इच्छामरणाच्या विरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा सुरु असताना त्याला विरोध म्हणून फेमेनच्या पाच महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी टॉपलेस स्थितीत प्रवेश केला आणि त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत झालं. फेमिन महिला कार्यकर्त्यांनी विना कपडे, टॉपलेस (Women go topless in support of abortion law in Paris) अशा स्थितीत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. या कार्यकर्त्यांच्या हातात 'गर्भपात पवित्र आहे' अशा आशयाचे पोस्टर्स घेतले होते. या आंदोलनाच्या दरम्यान फेमेनच्या पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
Intervention policière, les militantes sont interpellées. pic.twitter.com/19TKdNBqqZ
— Remy Buisine (@RemyBuisine) January 22, 2023
यासंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्भपाताचे आणि इच्छामरणासंबंधित हे विधेयक 1 फेब्रुवारीला फ्रान्सच्या सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटी फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले. त्यानंतर आता हे विधेयक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेटमध्ये येणे अपेक्षित आहे. लैंगिक आणि प्रजनन अधिकारांना घटनात्मक दर्जा देणे हा या विधेयकाचा आधार आहे. यामुळे महिलांचे अधिकार बळकट होतील, अशी आशा अनेक फ्रेंच महिला संघटनांनी व्यक्त केली आहे. तर फ्रान्समध्ये याविरोधात निदर्शने सुरू आहेत.
ही बातमी वाचा: