एक्स्प्लोर
इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचं कोर्टात निधन
मोहम्मद मोर्सी हे 2012 मध्ये देशाचे राष्ट्रपती बनले होते. होस्नी मुबारक यांना पदावरुन हटवल्यानंतर तिथे मोठ्या काळाने निवडणूक झाली होती.
काहिरा : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचं न्यायालयातच निधन झालं. देशाच्या सरकारी वृत्तवाहिनीने ही माहिती दिली. गुप्तहेरीच्या आरोपाच्या सुनावणीसाठी 67 वर्षीय मोहम्मद मोर्सी न्यायालयात हजर होते. त्यावेळी अचानक ते बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
20 वर्षांची शिक्षा
मोहम्मद मोर्सीवर फलस्तिनी इस्लामवादी संघटना हमाससोबत संपर्क असल्याचा आणि गुप्तहेरीचा आरोप होता. तर 2012 मध्ये आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या हत्येसाठी ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते.
अवघ्या एक वर्षात मुर्सींची सत्ता उलथली
मोहम्मद मोर्सी हे 2012 मध्ये देशाचे राष्ट्रपती बनले होते. हुस्नी मुबारक यांना पदावरुन हटवल्यानंतर तिथे मोठ्या काळाने निवडणूक झाली होती. मोर्सी यांचा संबंध मुस्लीम ब्रदरहूड या देशातील सर्वात मोठ्या इस्लामी संघटनेशी होता. पण आता ही संघटना बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे.
इजिप्तच्या सैन्याने मोठ्या आंदोलन आणि विरोधानंतर 2013 मध्ये मोर्सी यांची सत्ता उलथवली होती आणि ब्रदरहूडला ठेचलं होतं. सैन्याने मोर्सीसह संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक केली होती. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करणारे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी व्यवसायाने अभियंता होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement