China Population : लवकरात लवकर लग्न करा आणि 3 मुलं जन्माला घाला ! जन्मदर घटल्याने चीन तगडा निर्णय घेण्याच्या तयारीत
घटत्या जन्मदरामुळे हैराण झालेल्या चीनने (China Population) आपल्या नागरिकांवर लवकर लग्न करावे आणि प्रति व्यक्ती किमान तीन मुले व्हावीत यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
![China Population : लवकरात लवकर लग्न करा आणि 3 मुलं जन्माला घाला ! जन्मदर घटल्याने चीन तगडा निर्णय घेण्याच्या तयारीत Forced pregnancies will be carried out in China could take steps to recover from falling birth rates China Population : लवकरात लवकर लग्न करा आणि 3 मुलं जन्माला घाला ! जन्मदर घटल्याने चीन तगडा निर्णय घेण्याच्या तयारीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/e1c8fcdc4d6d95d5e21c2c8412e159c9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बिजिंग : जन्मदरात घट झाल्याने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसमोर (China Population) नवी समस्या निर्माण झाली आहे. लोक वृद्ध होत आहेत आणि देशात तरुणांची कमतरता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कामगारांची मोठी कमतरता भासू शकते. जन्मदरातील घसरणीतून सावरण्यासाठी चीन सक्तीच्या गर्भधारणेच्या धोरणाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. या रणनीतीअंतर्गत चीन लोकांना मुले जन्माला घालण्यास भाग पाडू शकतो.
घटत्या जन्मदरामुळे (China Population) हैराण झालेल्या चीनने आपल्या नागरिकांवर लवकर लग्न करावे आणि प्रति व्यक्ती किमान तीन मुले व्हावीत यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. जिओपॉलिटिकाच्या अहवालानुसार, लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने विविध प्रकारच्या स्पर्धाही सुरू केल्या आहेत.
चीनमध्ये मुलं न जन्माला न घालण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची काळजी. चीनमधील बहुतेक पालकांचा दावा आहे की ते त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी आणि काळजी घेण्यासाठी पुरेशा आर्थिक सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाहीत.
कारण कोरोना व्हायरसमुळे कडक क्वारंटाईन आणि लॉकडाऊनमुळे त्याचे आयुष्य खूप दबावाखाली आहे. हाँगकाँग पोस्टच्या अहवालानुसार, घरांमध्ये बंदिस्त राहण्याची सक्ती, अन्नाची कमतरता, उत्पन्नाचा अभाव, वाढत्या किंमती, आरोग्य समस्या इत्यादींमुळे देशातील लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)