एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुखी माणसाचा सदरा फिनलंडवासियांकडे, भारताची पिछेहाट
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 समाधानी देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला.
मुंबई : जगातील सर्वात आनंदी देशाला भेट द्यायची असल्यास तुम्ही कुठे जाल? असा प्रश्न विचारल्यावर अमेरिकेपासून युरोपमधल्या अनेक देशांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतील. पण जगातील सर्वाधिक सुखी किंवा 'हॅपी' देश म्हणून यावर्षी फिनलंड देशाची निवड झाली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला. भारत मात्र या यादीमध्ये 133 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्तानही 75 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकने पाच क्रमांकांनी आघाडी घेतली, तर भारताची मात्र घसरणच झाली आहे.
पाकिस्तानप्रमाणे भारताचे सर्व शेजारी देशही समाधानी देशांच्या यादीत पुढे आहेत. चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116) आपल्या देशापेक्षा सरस ठरले आहेत.
फिनलंडनंतर नॉर्व, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांचा टॉप 10 मध्ये समावेश होतो. अमेरिका या यादीत अठराव्या, तर इंग्लंड एकोणीसाव्या स्थानावर आहे. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
आनंदी देशाची व्याख्या ठरवताना काही महत्वाचे निकष लावले जातात. प्रत्येक देशातील नागरिकांचं स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, विश्वास, आरोग्य आणि उत्पन्न या गोष्टी पाहिल्या जातात.
फक्त देशातील नागरिकच नाही, तर या देशाला भेट देणाऱ्या प्रवाशांचंही जीवनमान पाहिलं जातं. फिनलंडवासियांचं आयुष्य सर्वाधिक सुखी, समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी असल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement