मैत्री निभावली! विन डिजेलनं केलं पॉल वॉकरच्या मुलीचं कन्यादान
दिवंगत अभिनेता पॉल वॉकरच्या (Paul Walker) मुलीचं कन्यादान त्याचा जिवलग मित्र आणि अभिनेता विन डिजेलने (Vin Diesel) केलं आहे.
Vin Diesel : फास्ट अॅन्ड फ्युरियस चित्रपटातील दिवंगत अभिनेता पॉल वॉकर (Paul Walker) याची मुलगी मिडो वॉकर आज लग्नाच्या बेडीत अडकली. पॉल वॉकरचा जिवलग मित्र अभिनेता विन डिजेलने (Vin Diesel) मिडो वॉकरचे (Meadow Walker) कन्यादान करुन आपली मैत्री निभावली. ख्रिश्चन रितीरिवाजानुसार, विन डिजेल मिडो वॉकरला घेऊन वरापाशी घेऊन गेला आणि मिडोचा हात त्याचा हातात दिला. या दृष्यामुळे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.
हॉलिवूड अभिनेता आणि फास्ट अॅन्ड फ्युरियस चित्रपटातील स्टार पॉल वॉकरचा 30 नोव्हेंबर 2013 साली एका अपघातात निधन झालं होतं. पॉल वॉकरचे त्याच्या सहकारी अभिनेत्यांशी एक खास असं नातं होतं. आता पॉल वॉकरच्या मुलीने अभिनेता लुईस अलानसोबत लग्न केलं.
विन डिजेलने पित्याची भूमिका निभावली
या लग्नामध्ये अभिनेता विन डिजेलने मिडो वॉकरच्या पित्याची भूमिका निभावली. त्यामुळे पॉल वॉकरचे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. विन डिजेल हा मिडो वॉकरचा गॉड फादर आहे. विन डिजेल आणि पॉल वॉकरची मैत्री ही जगजाहीर होती. दोघेही एकमेकांना आपल्या परिवाराचा घटक मानत होते.
सन 2013 साली पॉल वॉकरचं एका कार अपघातात निधन झालं होतं. त्याच्या मृत्यूनंतर पॉल वॉकरचा परिवार आणि विन डिजेललाही मोठा धक्का बसला होता. बराच काळ ते या धक्क्यातून सावरले नव्हते. नंतरच्या काळात विन डिजेलने पॉल वॉकरच्या परिवाराची जबाबदारी घेतली. आता त्याने मिडो वॉकरचे कन्यादान करुन नुकतीच एक मोठी जबाबदारी पार पाडली नाही तर खऱ्या अर्थाने पॉल वॉकरसोबतची मैत्री निभावली.
महत्वाच्या बातम्या :