(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cheapest Electricity: 'या' देशात लोकांचं वीज बिल येतं मायनसमध्ये; सरकारही चिंतेत! जाणून घ्या त्यामागचं कारण
Cheapest Electricity: रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभर ऊर्जेचं गंभीर संकट आहे. अशा परिस्थितीत एक असा देश आहे, जिथे लोकांच्या घरचं वीज बिल हे मायनसमध्ये येत आहे.
Electricity Bill: महागाईच्या युगात वाढत्या वीजबिलांमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. अशातच समजा तुमचं वीज बिल (Light Bill) शून्य आलं तर? भलेही हे ऐकायला फक्त गंमत वाटत असेल, तरी जगातील एका देशात असं खरोखर घडतं आहे. तेथील लोकांना वीज बिल शून्याच्याही खाली येत आहे, म्हणजेच या देशातील लोकांचं वीज बिल मायनसमध्ये येत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊया.
वीज बिल शून्याच्याही खाली
आजकाल एक युरोपियन देश अशा समस्येशी झुंजत आहे, जे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. फिनलँड देशात इतकी स्वच्छ वीज निर्माण होऊ लागली आहे की ऊर्जेच्या किमती देखील शून्याच्या खाली गेल्या आहेत. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? हेच अधिकाऱ्यांसमोरील मोठं आव्हान आहे.
चिंतेत आहे हा देश
एकीकडे दुसर्या रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) संपूर्ण युरोपमध्ये ऊर्जेचं संकट निर्माण झालं आहे आणि विजेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचवेळी दुसरीकडे, फिनलँड हा असा देश आहे जिथे भरपूर प्रमाणात रिन्यूएबल एनर्जी (Renewable energy) तयार होत आहे.
इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, फिनलंडच्या ग्रिड ऑपरेटर फिंग्रिडचे सीईओ जुक्का रुसुनेन म्हणतात की, देशात इतक्या प्रमाणात वीज निर्माण केली जात आहे की, ऊर्जेची सरासरी किंमत शून्याच्याही खाली पोहोचली आहे. तथापि, असे सहसा होत नाही, परंतु आजकाल फिनलँड या विचित्र समस्येने त्रस्त आहे.
हे सर्व कसं घडलं?
खरं तर, युक्रेनवरील संकटामुळे जगभरात ऊर्जेच्या किमती वाढत होत्या, तेव्हा फिनलँडनेही नागरिकांना विचार करुन वीज वापरण्याचं आवाहन केलं होतं आणि याबाबत अनेकवेळा आदेशही काढण्यात आले होते. एक वेळ तर अशी आली होती ज्यावेळी या उपायांव्यतिरिक्त आणखी काहीतरी करावं लागेल असं वाटत होतं.
मात्र यानंतर फिनलँडमधील सरकारने अक्षय ऊर्जेमध्ये (Renewable Energy) मोठी गुंतवणूक केली, त्याचे प्लांट्स वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आले आणि त्यामुळे काही महिन्यांतच गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत गेली. त्यानंतर मात्र, वीज उत्पादनात कपात करावी लागली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात पुरेशी वीज आहे आणि ते ही वीज विकण्याचा विचार करत आहेत.
उपायाच्या शोधात फिनलँड
फिनलँडची लोकसंख्या 55 लाखांच्या जवळपास आहे. इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये देशात नवीन अणुभट्टीही सुरू करण्यात आली होती. परिस्थिती पाहता, तेथील सरकारने यापूर्वीच विजेच्या दरात 75 टक्क्यांपर्यंत कपात केली होती. पण तरीही एवढ्या विजेचं काय करायचं हा त्यांच्यापुढे प्रश्नच आहे.
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI