Frank Hoogerbeets : जे बोलला ते खरं ठरलं! भविष्यवाणी करणाऱ्या 'या' व्यक्तीची गोष्ट, भारताबद्दल म्हणाला...
Earthquake Predictor Frank Hoogerbeets : भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी भूकंपाबाबत केलेली भविष्यवाणी प्रत्येक वेळी खरी ठरली आहे.
Frank Hoogerbeets Earthquake Predictor : तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी भूकंप आला. यामुळे 35 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपानंतर तुर्की आणि सीरियातील परिस्थिती आणि विध्वंस पाहता जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप होण्याआधी तीन दिवस एक शास्त्रज्ञाने या भूकंपाबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. या शास्त्रज्ञाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वैज्ञानिकाने केले भविष्यवाणी प्रत्येक वेळी खरी ठरल्याचं बोललं जात आहे.
आता या शास्त्रज्ञाने भारताबाबतही धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या शास्त्रज्ञाचं नाव आहे फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) आहे. भूगर्भशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर चर्चेत आले आहेत. कोण आहे फ्रँक हूगरबीट्स जाणून कोण आहे आणि त्यांची कोणती भाकीत खरी ठरली आहेत.
कोण आहेत फ्रँक हूगरबीट्स?
फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) हे नेदरलँडचे रहिवासी आहेत. हूगरबीट्स एक भूगर्भशास्त्रज्ञ आणि डच संशोधक आहेत. सोलर सिस्टम ज्योमेट्री सर्व्हे (SSGEOS) या संस्थेसाठी काम करतात. हूगरबीट्स यांचा दावा आहे की, ते भूकंपाबाबत भाकीत करू शकतात. हूगरबीट्स SSGEOS या संशोधन संस्थेसाठी काम करतात. ही संस्था भूकंपाच्या हालचालींचा अंदाज घेण्यासाठी ग्रहांसारख्या खगोलीय घटनांचं निरीक्षण करते. हूगरबीट्स यांनी अनेक भूकंपाबाबत केलेलं भाकित खरं ठरल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आता भारताबाबत भविष्यवाणी केल्याने ते अधिक व्हायरल होत आहेत.
भूकंपाबाबत वर्तवलेल्या भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या
भूकंपाबाबत अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं पण फ्रँक हूगरबीट्स यांनी हे खोटं ठरवलं आहे. त्यांनी भूकंपाबाबत वर्तवलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचं बोललं जातं. तुर्की आणि सीरियातील भूकंपाबाबतही त्यांनी भविष्यवाणी केली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसांनी येथे विनाशकारी भूकंप झाला. घरे आणि इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आणि हजारो लोक या खाली गाडले गेले.
फ्रँक हूगरबीट्स यांची लोकप्रियता वाढली
भूकंपांवर संशोधन करणाऱ्या युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, भूकंपाचा अंदाज लावण्याचा कोणताही विश्वसनीय मार्ग नाही आणि असा करण्याचा प्रयत्न केल्यास लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होऊ शकते. दरम्यान, फ्रँक हूगरबीट्स यांची भविष्यवाणी अनेक वेळा खरी ठरल्यामुळे त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे.
'या' भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या
मीडिया रिपोर्टनुसार, फ्रँक हूगरबीट्स यांनी 2019 मध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाबाबतही अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला. हूगरबीट्स यांनी या भूकंपाचा इशारा दिला होता. त्याआधी 2019 मध्येच त्यांनी 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान इराक आणि इराण सीमेवर भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि तेथे 8 जुलै रोजी भूकंप झाला होता. त्यांनी कॅलिफोर्नियातील भूकंपाबद्दलही इशारा दिला होता. त्यांनी जपान आणि नेपाळच्या भूकंपाबद्दल केलेलं भाकित खरं ठरलं. त्यानंतर अलीकडेच तुर्की आणि सीरियातील भूकंपाचा इशाराही खरा ठरला.
भारतालाही विनाशकारी भूकंपाचा धोका?
दरम्यान, आता शास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स यांनी भारतातही भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हूगरबीट्स यांनी भारताबद्दल भाकित करत सांगितलं आहे की, भारताला मोठा भूकंपाचा धक्का बसणार आहे. हिंद महासागर क्षेत्रातील देश म्हणजे भारत, पाकिस्तासह अफगाणिस्तानलाही याचा झटका बसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :