एक्स्प्लोर
Advertisement
गिरकी घेणारी गगनचुंबी इमारत, दुबईत अनोखा आविष्कार
दुबई : आकाशात उडणारे पक्षी, मासे यांना स्वतःभोवती गिरकी घेताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र माणसांप्रमाणे गिरकी घेणाऱ्या इमारतीची कल्पना तुम्ही केली आहे का? भारतात नाही, परंतु दुबईमध्ये 360 अंशांमध्ये स्वतःभोवती फिरणारी इमारत बांधली जात आहे.
गिरक्या घेणारी इमारत, असा स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळणार आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसांनाही डुलण्याचा आनंद मिळणार आहे. 80 मजल्यांची ही इमारती 90 मिनिटांमध्ये 360 अंशांच्या कोनामध्ये फिरणार आहे.
या इमारतीचा मजला एका मिनिटात जास्तीत जास्त 6 मीटर फिरणार आहे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या सुरक्षेबाबतही काळजी घेतली जाणार आहे.
इमारतीचा प्रत्येक मजला रिव्हॉल्व्हिंग ठेवण्यात येणार आहे. जगातली ही पहिली फिरती इमारत दुबईत आहे. वास्तुरचनाकार डेव्हिड फिशर यांनी इमारतीचं स्थापत्य तयार केलं आहे. इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम 6 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून, 2020 पर्यंत संपूर्ण इमारत तयार होणार आहे.
या इमारतीचा प्रत्येक मजला मजबूत सिमेंट बेसच्या माध्यमातून गिरक्या घेणार आहे. इमारतीतील रहिवाशांना पर्शियन गल्फ आणि दुबईतल्या चहूबाजूंकडील दृश्य पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही इमारत विजेचीही निर्मिती करणार असून ती वीज इमारतीतील रहिवाशांना वापरता येणार आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement