एक्स्प्लोर
व्हिडिओ : ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री, अँकरला हसू अनावर!
![व्हिडिओ : ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री, अँकरला हसू अनावर! Dog Interrupts Russian News Broadcast Anchor A Cat Person In Moscow Latest Update व्हिडिओ : ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री, अँकरला हसू अनावर!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/24182939/moscow.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मॉस्को : ब्रेकिंग न्यूज देताना अनेकदा अँकर आणि रिपोर्टरसोबत खूप गमतीदार किस्से घडतात. असाच किस्सा रशियन न्यूज चॅनेल वर्ल्ड 24 च्या अँकरच्या बाबतीत घडला आहे. ब्रेकिंग न्यूज देताना काळ्या रंगाचा लॅब्राडॉर कुत्रा स्टुडिओमध्ये घुसला आणि अंकरच्या मागे जाऊन उभा राहिला. झाल्या प्रकारानं अँकर सर्वात आधी दचकली आणि त्यानंतर तिनं बातमी देण्याचा प्रयत्न केला, मात्र या साऱ्या प्रकारात तिला हसू आवरलं नाही.
मॉस्कोतील चॅनेलच्या मुख्य कार्यालयात महिला अँकर एक ब्रेकिंग न्यूज देत होती. मात्र त्याचवेळी इन्वॅडर नाव्याच्या तिच्या लॅब्राडॉर कुत्र्यानं स्टुडिओमध्ये एंट्री केली आणि अँकरसमोरील डेस्कवर चढण्याचा प्रयत्न चालवला. या प्रकारानं सर्वात आधी महिला अँकर सर्वात आधी गांगरली, मात्र लगेच स्वत:ला सावरत तिनं बातमी देणं सुरुच ठेवलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि असंख्य लोकांनी लाईव्ह पाहिला.
डेस्कवर चढता न आल्यानं कुत्र्यानं आपली मान डेस्कवर टेकवली. लाईव्ह गेल्यानंतर लगेच हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)