एक्स्प्लोर
फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा राग, लग्नाच्या दोन तासांनंतर घटस्फोट
रियाध (सौदी अरेबिया) : लग्न म्हणजे सात जन्माचं नातं असं म्हटलं जातं. मात्र, सौदी अरेबियातील एक लग्न दोन तासही टिकलं नाही. वधूने लग्नाचे फोटो स्नॅपचॅट या सोशल मीडियावर शेअर केल्याने नवरदेवाला राग आला आणि त्याच रागात त्याने वधूला लग्नाच्या अवघ्या दोन तासांनंतर तलाक दिला.
लग्नाआधी दोघांमध्ये एक अट ठेवण्यात आली होती. या अटीनुसार, लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ कुठेही शेअर करायचे नाहीत. एवढच नव्हे, या दोघांनी यासंदर्भात करारास्वरुपात कागदपत्रही तयार केलं होतं. दुर्दैवाने वधू स्वत:वर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिने लग्नाचे फोटो स्नॅपचॅटवर शेअर केले.
वधूच्या भावाने सौदी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा दोघांमध्ये करार झाला होता. या करारानुसार लग्नाचा व्हिडीओ किंवा फोटो स्नॅपचॅट, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर शेअर करायचा नाही, असे ठरले होते. मात्र, या सर्व अटींचा वधून पालन केलं नाही आणि परिणामी लग्न तुटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement