एक्स्प्लोर
झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं
झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं हातात घेतल्याचं वृत्त होतं. लष्करी राजवटीनंतर सत्तारुढ पक्षाने दावा केला आहे की, सत्तापालटासाठी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक करण्यात आली आहे.

फोटो सौैजन्य : नवभारत टाईम्स
हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं हातात घेतल्याचं वृत्त होतं. लष्करी राजवटीनंतर सत्तारुढ पक्षाने दावा केला आहे की, सत्तापालटासाठी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक करण्यात आली आहे.
देशाचे उपराष्ट्रपती इमरसन मनंगावा यांच्या बरखास्तीनंतर लष्करप्रमुख राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना आव्हान दिलं होतं.
झिम्बाब्वेमध्ये नेमकं काय झालं?
मुगाबेंच्या झेडएएनयू पीएल पक्षाने लष्करप्रमुख कान्सटॅनटिनो चिवेंगा यांच्यावर मंगळवारी देशद्रोहाचा आरोप केला. झिम्बाब्वेमधील परिस्थिती आधीपासूनच बिकट असताना, सत्तारुढ पक्षाच्या आरोपांमुळे राष्ट्रपतींसमोर मोठा पेच निर्माण झाला.
वास्तविक, राष्ट्रपती मुगाबे यांनी उपराष्ट्रपती एमरसन यांची बरखास्ती मागे घ्यावी, अशी चिवेंगा यांनी मागणी केली. पण सत्तारुढ पक्ष झेडएएनयू-पीएलने चिवेंगा यांची ही भूमिका देशद्रोही असल्याचं म्हटलं. तसेच त्यांचा उद्देश देशातील जनतेला चिथावणी देण्याचा असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, उपराष्ट्रपती मनांगाग्वा यांच्या बरखास्तीपाठीमागे मनांगाग्वा आणि राष्ट्रपती मुनाबे यांची पत्नी ग्रेस यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. झिम्बाब्वेच्या पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ग्रेस यांच्या नावाची सत्तारुढ पक्षाकडून जोरदार चर्चा आहे. पण त्यांना मनांगाग्वा यांचं कडव आव्हान असल्याचं बोललं जात आहे.
झिम्बाब्वेमध्ये आज काय झालं?@AFP graphic on developing story in Zimbabwe. Military vehicles have blocked roads outside the parliament in Harare pic.twitter.com/MbeWerkL83
— AFP news agency (@AFP) November 15, 2017
- लष्कराने झिम्बाब्वेच्या नॅशनल ब्रॉडकास्टरच्या मुख्यालयाचा बुधवारी ताबा घेतला.
- पण लष्कराच्या एका अधिकाऱ्याने टीव्ही चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेत झिम्बाब्वेमध्ये लष्करी राजवटीसाठी सत्तापालटाचे कोणतेही प्रयत्न सुरु नसून, राष्ट्रपती मुगाबे आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित आहेत.
- दुसरीकडे सत्तारुढ पक्षाने ट्वीट दावा केला आहे की, लष्कराने मुगाबे आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे.
- हरारेमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या गाड्यांनी झिम्बाब्वेचं संसद आणि सत्तारुढ पक्ष झेडएएनयू पीएलच्या मुख्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.
- तर यापूर्वी राजधानी हरारेमधील राष्ट्रपती मुगाबे यांच्या खासगी बंगल्याजवळही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. पण लष्कराकडून मुगाबे आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
