Pfizer Covid Vaccine : पोलिओप्रमाणे फायझर लसीचा डोस दरवर्षी घ्यावा लागणार?
जगभर कोरोनाचं थैमान आहे आणि सध्या आधार आहे तो कोरोनाच्या लसीचा. मात्र ही लस किती वेळा घ्यावी आणि लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कधीपर्यंत ती तुम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी म्हटलंय की फायझर या लसीचे सुरुवातीचे दोन डोस घेतल्यानंतर तिसरा डोस हा बारा महिन्यांच्या आत घेणं गरजेचं आहे. सोबत त्यांनी हेदेखील सांगितलं की कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ही लस दरवर्षी सुद्धा घ्यावी लागू शकते. सध्या परिस्थिती अशी आहे की कोरोनाच्या या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते, सुरुवातीचे सहा ते बारा महिने आणि त्यानंतर दरवर्षी ही लस घेत राहावी लागेल असं अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितलं. परंतु दरवर्षी लसीकरण करावं लागणार ही केवळ शक्यताच वर्तवली जातेय, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोनावरील Pfizer च्या लसीला परवानगी, लस 95 टक्के प्रभावी
कोरोना व्हायरसमुळे मोठ्या संख्येने बळी जातायत, यावर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. जॉन्सन आणि जॉन्सनचे मुख्य अधिकारी अॅलेक्स गोर्स्की यांनीदेखील असंच एक वक्तव्य केलं. हंगामी फ्लूच्या लसीकरणाप्रमाणेच या लसीचादेखील दरवर्षी डोस घेण्याची आवश्यकता भासू शकते, असं त्यांनी म्हटलं. कोरोनाचं हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोना व्हायरसपासून एखादी व्यक्ती किती दिवस सुरक्षित राहू शकते याची कल्पना अद्याप संशोधकांना नाही. त्यामुळे या लसींचा कितपत परिणाम होणार आहे व तो किती काळ टिकणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
फायझर ही लस कोरोना व्हायरसपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात 91% प्रभावी आहे असा दावा फायझरने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला केला होता. दुसऱ्या डोसनंतर ही लस कोरोना रोखण्यासाठी 95% मदत करते असाही त्यांनी दावा केला. फायझरप्रमाणेच तंत्रज्ञान वापरून तयार केलेली मॉडर्ना ही लसदेखील मागील सहा महिन्यांमध्ये अत्यंत प्रभावी ठरली आहे. फायझरच्या परीक्षणासाठी वापरलेला डेटा हा 12,000 लसीकरण केलेल्या नागरिकांवर आधारित होता. ही लस किती प्रभावी आहे आणि सहा महिन्यांनंतर देखील कोरोनापासून संरक्षण करते का याबाबत स्पष्टता मिळण्यासाठी आणखी परीक्षण गरजेचं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )