Omicron Symptom : ओमायक्रॉनची 'ही' लक्षणं केवळ त्वचेवर दिसून येतात; सावध व्हा, अन्यथा...
Omicron Symptom : ओमायक्रॉनची 'ही' लक्षणं केवळ त्वचेवर दिसून येतात. त्यामुळे सावध राहणं गरेजेचं आहे. तुमच्याही त्वचेवर अशी लक्षणं दिसून आली तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Omicron Symptom : देशात वेगानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येनं धाकधुक वाढवली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन जरी कमी घातक असल्याचं सांगितलं जात असलं तरीही याचा संसर्गाचा वेग अधिक आहे. एक ओमायक्रॉनबाधित रुग्ण असंख्य जणांना बाधित करु शकतो. तसेच ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळी आहेत. तज्ज्ञांच्या मते, लक्षणांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरुन याचा वाढणारा प्रादुर्भाव वेळीच रोखणं शक्य होईल.
तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनच्या अनेक लक्षणांबाबत आपण सर्वांनी ऐकलं आहेच. पण यापैकी एक लक्षण असं आहे की, जे फारसं लक्षात येत नाही. अनेकजण आपल्या त्वचेकडे फारसं लक्ष देत नाहीत. ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे स्किनवर रॅशेज (Skin Rashes) येऊ शकतात. ZOE कोविड लक्षणांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसाक, ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्तींना त्वचेवर लाल चट्टे आल्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमयक्रॉनचं हे एक मुख्य लक्षण आहे, याकडे दुर्लक्ष करणं घातक ठरु शकतं.
दोन प्रकारचे स्किन रॅशेज
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनबाधित रुग्णांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्किन रॅशेज पाहायला मिळतात. एका प्रकारात स्किन रॅशेज खूप जास्त आणि अचानक येतात. लहान फोड्यांप्रमाणे हे रॅशेज दिसतात. ज्यावर खाजही सुटते. साधारणतः याची सुरुवात हाता-पायांच्या तळव्यापासून होते. दुसऱ्या प्रकारात रॅशेज घामोळ्यांप्रमाणे येतात आणि संपूर्ण शरीरावर वेगानं पसरतात. दरम्यान, हाताचे कोपर, गुडघे आणि हाता-पायाच्या त्वचेवर येतात.
डॉक्टरांचा सल्ला
लंडनमधील एका डॉक्टरांनी यापूर्वीही चेतावणी दिली होती की, ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या मुलांच्या त्वचेवर लाल चट्टे दिसून आले होते. दरम्यान, प्रौढ लोकांमध्ये ही लक्षणं फार कमी आढळून आली. डॉ डेविड लॉयड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना जवळपास ओमायक्रॉनच्या 15 टक्के तरुण रुग्णांमध्ये रॅशेज दिसले होते. याव्यतिरिक्त यांच्यात थकवा, डोकेदुखी आणि भूक न लागणं यांसारख्या समस्या उद्भवल्याचं पाहायला मिळालं होतं. आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की, अशी लक्षणं वेळीच लक्षात घेऊन त्यावर उपाचर करणं गरजेचं आहे.
ओमायक्रॉन कसा ओळखायचा? भारतीय संशोधकांची भन्नाट युक्ती
ओमायक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. दररोज या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंट शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावं लागतेय, त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच जीनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टला उशीर लागत असल्यामुळेही आरोग्य विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अशातच भारतीय संशोधकांनी ओमायक्रॉनच्या लवकर निदानासाठी भन्नाट युक्ती अंमलात आणली आहे. "एस जीन टार्गेट फेल्युअर" (S gene Dropout Or S Gene Target Failure) असे त्याचे नाव आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका खास किटच्या मदतीने जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का? हे चाचणीमधून स्पष्ट होत आहे.
सध्या प्रशासनासमोर वाढत्या कोरोना बाधितांसह ते कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रोन ने संक्रमित तर नाही ना? हे शोधण्याचेही मोठे आव्हान आहे. मात्र, त्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग हे आवश्यक असल्याने ओमायक्रोनचं निदान होण्यामध्येच अनेक दिवसांचा कालावधी जात आहे. शिवाय ती प्रक्रिया प्रचंड खर्चिक ही आहे. मात्र, आता भारतीय संशोधकांनी एक नवी युक्ती अंमलात आणली आहे. "एस जीन टार्गेट फेल्युअर" असे त्याचे नाव असून आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका खास किटच्या मदतीने जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य विभागाने ओमायक्रोनच्या तीव्र संक्रमणासोबत लढण्यासाठी "एस जीन टार्गेट फेल्युअर" तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron Test Symptoms : ओमायक्रॉन कसा ओळखायचा?, भारतीय संशोधकांनी लढवली भन्नाट युक्ती
- ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ द्या, लोकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल; डॉक्टरांच्या दाव्यातील नेमकं तथ्य काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )