(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona vaccine | भारताच्या लसीने जगाला प्राणघातक कोरोना महामारीतून वाचवलं : अमेरिकी शास्त्रज्ञ
भारताच्या कोरोना लसीने जगाला प्राणघातक कोरोना महामारीतून वाचवले, असे अमेरिकेच्या अव्वल शास्त्रज्ञाने म्हटलं आहे.
हॉस्टन : कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात येऊन आता वर्ष उलटलं आहे. या महामारीने जगभरात हाहाकार उडला होता. अजूनही कोरोना संसर्ग कमी झाला नसला तरी आता कोरोना लसीकरण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहेत. दरम्यान, कोरोना लसीच्या माध्यमातून भारताने जगाला वाचवले असल्याचे अमेरिकेच्या महत्वाच्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे. भारताचे हे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
भारताचे औषध निर्मिती मधील ज्ञान आणि उत्पादनामुळे कोरोना महामारी काळात देशाला जगाची फार्मसी म्हटलंय. भारत जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. दिवसेंदिवस कोरोना लस खरेदी करण्यासाठी संपर्क करणाऱ्या देशांची संख्या वाढत आहे.
आता नाकाद्वारे लस? Bharat Biotechच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु!
नुकत्याच झालेल्या वेबिनारच्या वेळी ह्युस्टनमधील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिन (BCM) येथील नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे डीन पीटर होटेझ म्हणाले की दोन एमआरएनए (mRNA) लसींचा परिणाम जगातील निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होऊ शकत नाही. पण, भारताची लस परिणामकारक आहे. भारताने बीसीएम आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसारख्या जगातील विद्यापीठांच्या सहकार्याने लस विकसीत करुन जगाला या संकटातून वाचवलं आहे. त्यांच योगदारन कोणीही नाकारू शकत नाही.
Corona Vaccine Centre | लसीकरण केंद्रेचं सुपर स्प्रेडर होत नाहीत ना?
कोरोना लसीकरणानंतर पुन्हा सामान्य परिस्थिती येणे ही महत्वाची गोष्ट आहे. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आणि लस विकासातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त डॉक्टर-होटेझ म्हणाले की कोविड 19 लस ही भारताने जगाला कोरोनासोबत लढण्यासाठी दिलेली भेट आहे.
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशिल्डला भारतीय औषध नियामकांनी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर हैदराबादस्थित भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रिटीश फार्मा कंपनीच्या अॅस्ट्रॅजेनेका आणि कोवॅक्सिन यांनाही परवाना देण्यात आला आहे. वेबिनार इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ ग्रेटर होस्टने (IACCGH) आयोजित केले होते.