Covid-19 Pandemic: दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
Covid Pandemic In South Africa : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक म्युटेशन आहे.
New Covid-19 Variant In South Africa: : कोरोनाच्या एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती आली आहे. "दुर्दैवाने आम्हाला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना संक्रमणाचे कारण आहे."
वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा अधिक माहिती देताना म्हणाले की, हा व्हेरिएंट शास्त्री. लीनिएज B.1.1.1.529 या नावाने ओळखला जातो. या नव्या कोरोना व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक म्युटेशन आहे. हा कोरोना व्हेरिएंट बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेतून गेलेल्या अनेक प्रवाशांच्या कोरोना चाचणीत आढळला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरिएंट आमच्या चिंतेचा मुख्य कारण आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असे. मात्र आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून दिवसाला 1200 रुग्णांची नोंद होत आहे.
दक्षिण आफ्रिकमध्ये गेल्यावर्षी कोविड बीटा व्हेरिएंट आढळला. आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा शोध सर्वप्रथम भारतात लागला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कोरोनारुग्णांची नोंद होत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :