Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा
Corona Vaccination : Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी म्हटलंय की, यासंबंधित निरीक्षणाची माहिती अमेरिकेच्या औषध नियामक, अन्न आणि औषध प्रशासनाला देणार असल्याचं सांगितलंय.
![Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा Pfizer corona vaccine is effective even after four months for 12 to 15 year olds the company claims Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/24/9d0562a068ee356dbdb2b3b418adeba8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pfizer Vaccine Effectiveness: फायझरची कोविड लस (Pfizer Corona Vaccine)12 ते 15 वयोगटासाठी दुसऱ्या डोस घेतल्याच्या चार महिन्यानंतरही प्रभावी आहे, असा दावा अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायझरने केलाय. कंपनीनं यासंदर्भातील सर्वेक्षणाची नवी आकडेवारी जाहीर केलीय. यामध्ये 2228 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. 12 ते 15 वयोगटाचं फायझरची कोविडची लस घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या निरीक्षणानंतर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही, असं कंपंनीनं सांगितलंय.
फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी याबाबत सर्वेक्षणाची माहिती अमेरिकेच्या औषध नियामक, अन्न आणि औषध प्रशासनाला देणार असल्याचं सांगितलंय. काही ठिकाणी 12 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कोविडचं संक्रमण वाढत असल्याचं समोर आलंय. दरम्यान फायझरची लस घेतलेल्या भागांमध्ये हे संक्रमण कमी असल्याचं कंपनीचा दावा आहे.
फायझर लवकरच आणणार लहान मुलांसाठी कोरोनाची लस
अमेरिकेनं यावर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी फायझर लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली होती. अमेरिकेत सध्या फायझर लसीच्या केवळ 16 वर्ष आणि त्यापुढील वयोगटासाठीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय. त्यानंतर आता कंपनीनं 5 ते 11 वयोगटासाठी लसीच्या आपात्तकालीन वापराला परवानगी मागितलीय.
ब्रिटनमध्ये 12 ते 15 वयोगटातील सर्व मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीचा एक डोस देण्यास परवानगी देण्यात आली असून शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. 16 वर्षाखालील मुलांच्या पालकांच्या सहमतीनं मुलांचं लसीकरण करण्यात येतंय.
महत्त्वाच्या बातम्या :
मार्च-एप्रिलमध्ये 7 लाख मृत्यू होण्याची शक्यता, EUROPE ला आरोग्य संघटनेकडून COVID ALERT
कोरोना टेस्टिंग वाढवा, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पत्र
राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)