एक्स्प्लोर
Corona World Update | जगभरात एका दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 67 लाखांजवळ
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 67 लाखांच्या जवळपास गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 32 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 66.98 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास एक लाख 29 हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 5499 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 66.98 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 92 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 32 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 226,713 रुग्ण आहेत. तर 6,363 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 111,900 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 108,450 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 1,923,887 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 110,173 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 39,904 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 281,661 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 615,870 कोरोनाबाधित आहेत तर 34,039 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,133 लोकांचा मृत्यू झालाय. 287,740 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,689 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,013हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,923,887, मृत्यू- 110,173
- ब्राझील: कोरोनाबाधित- 615,870, मृत्यू- 34,039
- रशिया: कोरोनाबाधित- 441,108, मृत्यू- 5,384
- स्पेन: कोरोनाबाधित- 287,740, मृत्यू- 27,133
- यूके: कोरोनाबाधित- 281,661, मृत्यू- 39,904
- इटली: कोरोनाबाधित- 234,013, मृत्यू- 33,689
- भारत: कोरोनाबाधित- 226,713, मृत्यू- 6,363
- जर्मनी: कोरोनाबाधित- 184,923, मृत्यू- 8,736
- पेरू: कोरोनाबाधित- 183,198, मृत्यू- 5,031
- टर्की: कोरोनाबाधित- 167,410, मृत्यू- 4,630
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
