एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona World Update | जगभरात जवळपास 25 लाख कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांचा आकडा 58 लाखांजवळ
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 58 लाखांच्या जवळपास गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 24.94 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 58 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये एक लाख तीन हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 5,186 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,788,928 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 56 हजार 840 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 24 लाख 94 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 42.70 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 158,086 रुग्ण आहेत. तर 4,534 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 85,803 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 67,749 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,745,800 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 102,109 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 37,460 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 267,240 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 411,821 कोरोनाबाधित आहेत तर 25,598 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,118 लोकांचा मृत्यू झालाय. 283,849 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,072 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 231,139 इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,745,800, मृत्यू- 102,109
- ब्राझील: कोरोनाबाधित- 411,821, मृत्यू- 25,598
- रशिया: कोरोनाबाधित- 370,680, मृत्यू- 3,968
- स्पेन: कोरोनाबाधित- 283,849, मृत्यू- 27,118
- यूके: कोरोनाबाधित- 267,240, मृत्यू- 37,460
- इटली: कोरोनाबाधित- 231,139, मृत्यू- 33,072
- फ्रांस: कोरोनाबाधित- 182,913, मृत्यू- 28,596
- जर्मनी: कोरोनाबाधित- 28,596, मृत्यू- 8,533
- टर्की: कोरोनाबाधित- 159,797, मृत्यू- 4,431
- भारत: कोरोनाबाधित- 158,086, मृत्यू- 4,534
12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन, ब्राझील या सहा देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा एक लाखांच्या वर गेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement