(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 46 लाखांवर तर 17.50 लाखांहून अधिक रुग्ण बरे
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 46 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 46 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात 99,116 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5,050 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 308,642 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,758,032 इतके कोरोनाबाधित बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 85,784 रुग्ण, तर 2,753 बळी कोरोनामुळं गेले आहेत.
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,484,004 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 88,485 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,998 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 236,711 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,459 लोकांचा मृत्यू झालाय. 274,367 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,610 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 223,885 इतका आहे.
या दहा देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,484,004, मृत्यू- 88,485
- स्पेन: कोरोनाबाधित- 274,367, मृत्यू- 27,459
- रशिया: कोरोनाबाधित- 262,843, मृत्यू- 2,418
- यूके: कोरोनाबाधित- 236,711, मृत्यू- 33,998
- इटली: कोरोनाबाधित- 223,885, मृत्यू- 31,610
- ब्राजील: कोरोनाबाधित- 218,223, मृत्यू- 14,817
- फ्रांस: कोरोनाबाधित- 179,506, मृत्यू- 27,529
- जर्मनी: कोरोनाबाधित- 175,699, मृत्यू- 8,001
- टर्की: कोरोनाबाधित- 146,457, मृत्यू- 4,055
- इरान: कोरोनाबाधित- 116,635, मृत्यू- 6,902
- पेरू: कोरोनाबाधित- 84,495, मृत्यू- 2,392
10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 88 हजारांवर गेला आहे.