एक्स्प्लोर

Coronavirus World Update | जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 लाख पार; आतापर्यंत 1.65 लाख जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 24 लाख पार पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1.65 लाख जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 24,06,823 वर पोहोचली आहे. 1,65,054 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 763,832, स्पेनमध्ये 198,674, इटलीमध्ये 178,972, फ्रान्समध्ये 152,894 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 40,553, स्पेनमध्ये 20,453, इटलीमध्ये 23,660, फ्रान्समध्ये 19,718, चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेमधील मृतांचा आकडा 40 हजार पार

अमेरिकेने 40 हजार बळींचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 1534 रूग्णांचा बळी गेला असून आतपर्यंत एकूण बळी 40 हजार 548वर पोहोचली आहे. तर अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या सात लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. एकट्या न्यूयॉर्क प्रांतात गेल्या 24 तासांत 627 बळी गेले आहेत. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार तर एकूण मृतांचा आकडा 18, 298 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4202, मिशिगनमध्ये 2391, मासाचुसेट्स 1706, लुझियाना 1296, इलिनॉईस 1290, कॅलिफोर्निया 1175, पेनसिल्वानिया 1237, कनेक्टिकट 1127 आणि वॉशिंग्टनमध्ये 629 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

युरोपमध्ये आतापर्यंत 101493 लोकांचा मृत्यू

युरोपमध्ये आतापर्यंत 101493 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1153148 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा मिळून 768670 रूग्ण समोर आले आहेत. तर 40 हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आशियामध्ये 162256 रूग्ण आणि 6951 लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम आशियामध्ये 122819 रूग्ण आणि 5559 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ : लॉकडाऊनच्या काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ही योगासंन करा, रामदेव बाबांचं मार्गदर्शन

अमेरिकेव्यतिरिक्त स्पेन, इटली, इंग्लंड आणि फ्रान्समध्येही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. स्पेनने गेल्या चोवीस तासात 410 लोकांनी जीव गमावले. तर एकूण मृतांचा आकडा 20 हजार 453वर पोहोचला आहे. काल इटलीत कोविड-19 रोगाने 433 माणसांचा बळी घेतला. तर आता इटलीतील एकूण बळींची संख्या 23 हजार 660 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढली असून इटलीत आता जवळपास 1 लाख 79 हजार रुग्ण आहेत. तसेच इंग्लडमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. इंग्लंडने काल 16 हजार बळींचा आकडा ओलांडला असून काल दिवसभरात 596 लोकांनी जीव गमावला. त्यामुळे इंग्लंडमधील बळींचा आकडा 16060 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळतो. फ्रान्सने काल दिवसभरात 395 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत19 हजार 718 बळी गेले असून एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 53 हजार वर पोहोचला आहे.

कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, प्रसिध्द आल्प्स पर्वतावर भारतीय तिरंगा

जर्मनीत काल 104 बळी गेले असून एकूण बळींची संख्या 4642 वर पोहोचली आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत 87 ची भर पडली आहे. त्यामुळे इराणमधील एकूण मृतांचा आकडा 5118 वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 82211 वर पोहोचली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल 230 मृत्यूमुखी पडले असून एकूण बळींचा आकडा 5683 वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल 83 बळी घेतले तिथे एकूण 3684 लोक दगावले आहेत. टर्की 2017, ब्राझील 2462, स्वित्झर्लंडने 1393, स्वीडनमध्ये 1540, पोर्तुगाल 714, कॅनडात 1587, इंडोनेशिया 582, तर इस्रायलमध्ये 172 बळी घेतले आहेत. दक्षिण कोरियात काल 2 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 234 वर पोहोचला आहे. आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानात रुग्णांची संख्या 8348 वर पोहोचली आहे, तिथे 168 लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनाने गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75471 तर बळींच्या आकड्यात 4957 ची भर पडली.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!

दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election : आप तिसऱ्यांदा सत्तेत की भाजप रोखणार 'आप'चा रथ? Special ReportSpecial Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरणTorres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special ReportSalman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget