Coronavirus | जगात 93 लाख कोरोना बाधित; गेल्या 24 तासांत 1.60 लाख नवे रुग्ण
जगभरात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. अशातच जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 93 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार लाख 78 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus World Update | जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरातील प्रत्येक देशात आपले हातपाय पसरले आहेत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 93 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार लाख 78 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 66 टक्के रुग्ण फक्त 10 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 62 लाखांहून अधिक आहे.
जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?
जगभरातील इतर देशांपैकी कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 24 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाख 23 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढताच आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 35,991 रुग्ण आढळून आले आहेत. तर 863 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 40,131 रुग्ण आढळून आले असून 1,364 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
अमेरिका | एकूण रुग्ण : 2,424,144 | एकूण मृत्यू : 123,473 |
ब्राझील | एकूण रुग्ण : 1,151,479 | एकूण मृत्यू : 52,771 |
रशिया | एकूण रुग्ण : 599,705 | एकूण मृत्यू : 8,359 |
भारत | एकूण रुग्ण : 456,062 | एकूण मृत्यू : 14,483 |
यूके | एकूण रुग्ण : 306,210 | एकूण मृत्यू : 42,927 |
स्पेन | एकूण रुग्ण : 293,832 | एकूण मृत्यू : 28,325 |
पेरू | एकूण रुग्ण : 260,810 | एकूण मृत्यू : 8,404 |
चिली | एकूण रुग्ण : 250,767 | एकूण मृत्यू : 4,505 |
इटली | एकूण रुग्ण : 238,833 | एकूण मृत्यू : 34,675 |
इराण | एकूण रुग्ण : 209,970 | एकूण मृत्यू : 9,863 |
10 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण
ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, भारत, पेरू, चिली, इटली, इराणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन टॉ-20 कोरोना बाधित देशांच्या यादितून बाहेर पडला असून भारताचा समावेश टॉप-4 कोरोना बाधित देशांच्या यादित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
'आपण धोकादायक टप्प्यावर, कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय' : WHO
मलाला झाली ऑक्सफोर्डमधून पदवीधर, प्रियांकाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा