एक्स्प्लोर
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 82 लाखांवर, 43 लाख बरे झाले
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 82 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 43 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

Coronavirus: : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 82 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात 1.42 लाख कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 24 तासात साडेसहा हजार मृत्यू झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 82 लाख 51 हजार 213 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 45 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 43 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 3 लाख 54 हजार 065 रुग्ण आहेत. तर 11903 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 1 लाख 55 हजार 227 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1 लाख 86 हजार 935 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,208,389 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 119,132 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 928,834 कोरोनाबाधित आहेत तर 45,456 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 41,969 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 298,136 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,405 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 237,500 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित - 2,208,389, मृत्यू- 119,132
- ब्राझील: कोरोनाबाधित - 928,834, मृत्यू- 45,456
- रशिया: कोरोनाबाधित - 545,458, मृत्यू- 7,284
- भारत: कोरोनाबाधित - 354,161, मृत्यू- 11,921
- यूके: कोरोनाबाधित - 298,136, मृत्यू- 41,969
- स्पेन: कोरोनाबाधित - 291,408, मृत्यू- 27,136
- इटली: कोरोनाबाधित - 237,500, मृत्यू- 34,405
- पेरू: कोरोनाबाधित - 237,156, मृत्यू- 7,056
- इराण: कोरोनाबाधित - 192,439, मृत्यू- 9,065
- जर्मनी: कोरोनाबाधित - 188,382, मृत्यू- 8,910
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















