(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UK Corona Strain Crisis | कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनमध्ये Major Incident ची घोषणा
Major Incident हा शब्द सहसा एखादी मोठी घडामोड किंवा एखादी अशी घडामोड जिचे गंभीर परिणाम दिसून येणं अपेक्षित आहे आणि जी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खास व्यवस्था आणि आखणी करावी लागते
लंडन : युनायटेड किंग्डममध्ये (UK) कोरोनाच्या नव्या विषाणूनं थैमान घालण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गानं हाहाकार माजवला. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणाही केली. दर दिवशी (Coronavirus new strain)कोरोनाचं बळावणारं संकट आता युकेमध्ये आणखी गंभीर वळण घेत आहे. (London) लंडनमध्ये याचेच थेट पडसाद पाहायला मिळत आहेत. जिथं कोरोना रुग्णांची संख्या धडकी भरवणाऱ्या वेगानं वाढत आहे. ज्यामुळं लंडनचे महापौर सादिक खान यांनी तिथं परिस्थिती पाहता Major Incident ची घोषणा केली आहे.
एप्रिल महिन्यात, म्हणजेच जेव्हा संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजवला होता, त्यावेळच्या परिस्थितीपेक्षाही जवळपास 35 टक्के जास्त रुग्ण सध्याच्या घडीला इथं आढळले आहेत. अधिकृत आकडेवारी पाहिल्यास येथील एका पालिका क्षेत्रात किंवा borough मध्ये आठवड्यास 5 हजारहून जास्त नवे कोरोनाबाधित सापडत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील आठवड्यात इथं 6 हजार कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही सर्व परिस्थिती पाहता शुक्रवारी सादिक खान यांच्या ट्विटनं सर्वांच्या मनात असणारी भीती आणखी वाढवली. त्यांनी ट्विट करत लिहिलं, 'मी लंडनमध्ये Major Incident ची घोषणा करत आहे. कारण, कोरोनाच्या संकटानं आता धोक्याची परिसीमा गाठली आहे. लंडनमधील दर 30 नागरिकांमागे एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. आपण, आताच तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढून मृतांचा आक़डा वाढेल'.
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीला डोनाल्ड ट्रम्प जाणार नाहीत, ट्वीट करुन म्हणाले..
सादिक खान यांनी उल्लेख केलेला Major Incident म्हणजे नेमकं काय?
Major Incident म्हणजे एक अशी परिस्थिती जिथं एका घटनेमुळं अतिशय गंभीर परिणाम दिसून येण्यास सुरुवात होते. शिवाय ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जबाबदार संस्था किंवा संस्थांना कसोशीनं प्रयत्न करावे लागतात.
लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याची बाब खान यांनी मांडलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. जिथं मॅकेनिकल व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं मृतांच्या आकड्यात भर पडण्याची भीतीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. शिवाय लंडनमधील नागरिकांना आताच सतर्क केलं नाही, तर त्यांना आयुष्याशीच मोठी तडजोड करावी लागेल, त्यामुळं सर्व नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडूच नका, घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन करत असं आवाहन त्यांनी केलं.