एक्स्प्लोर

Corona Virus | चीनमधील कोरोना बाधितांच्या संख्येत घट, WHOची माहिती, व्हायरसमुळे आतापर्यंत 1523 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हौदोस घातला असून चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये 1523 लोकांचा मृत्यू झाला असून हळूहळू मृतांचा आकडा कमी होत असल्याचा चीन दावा करत आहे. दरम्यान, बीजिंगकडून या व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांचा जो डाटा आला आहे. त्यामध्ये पहिल्याच्या तुलनेत आकडा घटल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसरा, चीनमध्ये जवळपास 66 हजार 492 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

WHO चे जगभरातील शास्त्रज्ञांना आवाहन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आपातकालीन प्रमुख मायकल रेयान यांनी सर्व देशांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. कारण जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे WHO च्या वतीने एक आवाहन करण्यात आलं आहे. मायकल रेयान म्हणाले की, '1.38 मागील दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत वेगाने कमतरता आली आहे. सर्व शास्त्रज्ञांनी आपले प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. लोकांना मदत करण्यासाठी सर्व देशांनी आपल्या वैज्ञानिकांना एकत्र काम करू देणं गरजेचं आहे.'

पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसचं सध्याचं अपडेट काय? | बातमीच्या पलीकडे

भारताकडून चीनला जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द केल्या

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला असताना भारतीय विमान कंपन्यांनी चीनमध्ये जाणारी आपल्या जास्तीत जास्त उड्डान रद्द केली आहेत. स्पाइसजेटने 16 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीवरून हॉन्गकॉन्गला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोनेही 20 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीवरून चेंगदू येथे जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. एअर इंडियाने मुंबईवरून शांघाईला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.

चीनमध्ये जाणाऱ्यांसाठी सरकारने अॅडव्हायझरी जारी केली

कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहण्यासाठी भारत सरकारमे अनेक नव्या अॅडव्हायझरी जारी केल्या आहेत. ही अॅडव्हायझरी भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी आहेच, पण चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठीही आहे. सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायझरीनुसार, चीनमधून प्रवास करणाऱ्या कोणत्याही विदेशी नागरिकांसाठी सध्या असलेला वीजा मान्य करण्यात येणार नाही. प्रवास करणारे प्रवासी बीजिंग दूतावासातून संपर्क करतील, त्याचसोबत भारतीयांनाही चीनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

चीनमधून येणाऱ्या भारतीयांती पूर्णपणे तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एअरपोर्टवर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीनमध्ये भारतीय दूतावासाने दोन हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. चीनमध्ये फसलेल्या भारतीयांना +8618610952903 आणि +8618612083629 या दोन क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच ईमेल मार्फत helpdesk.beijing@mea.gov.in वरही संपर्क साधू शकतात.

पाहा व्हिडीओ : बिनधास्त खा चिकन! चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नसल्याचं पशुपालन आयुक्तांकडून स्पष्ट

चीनसोबतच जगभरातील 25 देशाचा कोरोनाशी सामना

जगभरातील 25 देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त मृत्यू चीनमधील वुहान आणि हुबेईमध्ये झाली आहे. चीनव्यतिरिक्त जपान, सिंगापूर, थायलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, तायवान, मलेशिया, व्हिएतनाम, फ्रान्स, UAE,कॅनडा, भारत, फिलीपीन, रूस, इटली, ब्रिटन, बेल्जियम, नेपाळ, श्रीलंका, स्वीडन, स्पेन, कंबोडिया आणि फिनलँडमध्येही कोरोना व्हायरसमुळे प्रभावित आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक उपाय - जास्तीत जास्त सावध राहणं

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा काही हजारांवर आहे. WHO ने या व्हायरसला कोविड-19 नाव दिलं आहे. आतापर्यंत यावर कोणताही उपाय मिळालेला नाही. परंतु, काही गोष्टींमध्ये सावधान असणं अत्यंत आवश्यक आहे.

- आपले हात साबण-पाणी किंवा अल्कोहोलयुक्त हँड रबने स्वच्छ करा. - खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा. - सर्दी किंवा ताप आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. - मांस आणि अंडी व्यवस्थित शिजवून खा. - भाज्या आणि फळं खाण्याआधी स्वच्छ धुवून खा. - गर्दी असलेल्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घ्या. - कोरोनाचा संसर्ग असलेल्या ठिकाणांहून आलेल्या लोकांपासून दूर राहा.

पाहा व्हिडीओ : Coronavirusचा मोबाईल व्यापाराला फटका, मोबाईल दुरुस्ती महागली

कोरोना व्हायरसवर औषध सापडल्याचा दावा

थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झाला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

लक्षणे कोणती आहेत ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

काय काळजी घ्याल?

तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.

संबंधित बातम्या : 

Corona Virus | चीनमध्ये मृतांचा आकडा 1000 पार; 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

जपानमध्ये क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले, क्रूजमधील 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग

कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा

Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांकडून राज्य आपत्तीची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण
Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget