एक्स्प्लोर
कोलंबियात भूस्खलनामुळे 207 नागरिकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
कोलंबिया : महाराष्ट्रात 3 वर्षापूर्वी माळीणमध्ये जशी दुर्घटना घडली, तोच प्रकार शुक्रवारी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियात झाला आहे. कोलंबिया देशात मुसळधार पावसामुळे मकाओ शहरात भूस्खलन होऊन 207 जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून भूस्खलन होण्यास सुरुवात झाली. जमीन खचल्यानं शहरातील घरं, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. वाहनं आणि झाडं पाण्यात वाहून गेली. यामध्ये 207 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी आहेत.
मोकोआ ही पुतुमायोची राजधानी आहे. घटनास्थळी बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बेपत्ता नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं बचाव दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement