Moon Mission : चीनने भारत आणि अमेरिकेला टाकलं मागे, चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन पृथ्वीकडे निघालं अंतराळयान
China Spacecraft Chang'e 6 : चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलेल्या चिनी अंतराळयानाने तेथून मातीचे नमुने घेतले असून ते पृथ्वीकडे रवाना झालं आहे.
मुंबई : चीननं (China) भारत (India) आणि अमेरिकेला (America) मागे टाकत चंद्रावर (Moon Mission) नवा इतिहास रचला आहे. चीनचं अंतराळयान चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन पृथ्वीच्या दिशेने निघालं आहे. चीनचं अंतराळयान चंद्राच्या अंधारात असलेल्या भागात उतरलं असून तेथील पृष्ठभागाचे नमुने घेऊन चीनचं यान पृथ्वीच्या दिशेने निघालं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने घेऊन चीनचं अंतराळयान आता पृथ्वीवर लवकरच लँड करण्याच्या तयारीत आहे. चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलेल्या चिनी अंतराळयान चांगई-6 तेथून मातीचे नमुने घेऊन पृथ्वीकडे रवाना झालं आहे.
चीनने चंद्रावर रचला इतिहास
चीनने चंद्रावर पोहोचून नवा विक्रम केला आहे. चीनची अंतराळ संस्था CNSA ने 3 मे 2024 रोजी लाँच केलेलं चांगई-6 अंतराळयान सुमारे महिन्याभराने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. चीनचं चांगई-6 अंतराळयान 2 जून रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. हे अंतराळयान चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलं. या अंतराळयानाने आता चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या दिशेने उड्डाण केलं आहे. हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं असून तिथून ते पृथ्वीच्या दिशेने परत येणार आहे.
चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन पृथ्वीकडे निघालं अंतराळयान
चीनचे अंतराळयान चांगई-6 चे चंद्राच्या फार साईडला म्हणजेच गडद काळोख असणाऱ्या भागापर्यंत पोहोचलं. त्यानंतर चांगई-6 चे असेंडर चंद्रावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन पृथ्वीकडे परतत आहे. असेंडर म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावरून त्याच्या कक्षेत परत आलेले साधन. आता असेंडर तिथून नमुने घेऊन पृथ्वीच्या दिशेने परत येत आहे.
चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणणार
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चांगई-6 च्या यशानंतर चीन चंद्रावर अंतराळ स्थानक बनवण्यात अमेरिका आणि इतर देशांना मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनची ही मोहिम यशस्वी झाल्यास लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे सुमारे 2 किलो नमुने पृथ्वीवर आणेल. चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करण्यासाठी, चीनने लँडरमध्ये ड्रिलिंग, खोदणे आणि मलबा उचलण्यासाठी एक मशीन बसण्यात आली होती. चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने लँडरच्या सर्वात वरच्या भागात ठेवण्यात आले आहेत.
25 जूनला पृथ्वीवर उतरणार अंतराळयान
दुसरे अंतराळ यान चंद्राच्या या भागात पाठवले जाईल आणि लँडरला पृथ्वीवर परत आणेल. चंद्राच्या पृष्ठभागावरुन पृथ्वीवर नमुने आणणे हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. 3 मे रोजी सुरू झालेलं ही मोहिम 53 दिवसांची असणार आहे. या अंतराळ यानाचं लँडिंग 25 जूनच्या सुमारास मंगोलियामध्ये होईल. सिन्हुआच्या रिपोर्टनुसार, चांगई-6 अपोलो बेसिन नावाच्या इम्पॅक्ट क्रेटरमध्ये उतरले. ते चंद्राभोवती 20 दिवस फिरले. त्यानंतर लँडरने चंद्राच्या अंधाऱ्या भागातून नमुने गोळा केले.