China India : चीनच्या कुरापती सुरुच, सीमेजवळ रेल्वे लाईन उभारणीचं काम हाती, अक्साई भागात पँगॉग सरोवराजवळ बांधकाम
India China Relation : रेल्वे तंत्रज्ञान (Railway Technology) विभागाच्या रिपोर्टनुसार, या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे (Railway) भारत आणि नेपाळपासून चीनच्या सीमेपर्यंत नवीन मार्ग तयार करण्यात येईल.
China New Railway Line Near LAC : भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील तणाव सर्वज्ञात आहे. चीनच्या कुरापती सुरुच आहेत. चीन सीमावर्ती भागात सातत्याने बांधकाम करुन सोयी-सुवाधा वाढवण्यावर भर देत आहे. आता चीन LAC जवळ नवीन रेल्वे लाईन उभारण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ही प्रस्तावित रेल्वे लाईन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि वादग्रस्त अक्साई चीन परिसरातून जाईल.
चीन सीमावर्ती भागात हालचाली कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारत सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करत आहे. रेल्वे तंत्रज्ञान विभागाच्या रिपोर्टनुसार, या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे भारत आणि नेपाळपासून चीनच्या सीमेपर्यंत नवीन मार्ग तयार करण्यात येईल. हा नवीन रेल्वे मार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होईल आणि वायव्येकडील नेपाळ सीमेजवळून जाईल.
वादग्रस्त अक्साई भागात रेल्वे ट्रॅकचं काम सुरु
भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे हे पाऊल भारत आणि तिबेट या दोन्ही देशांची चिंता वाढवणारं आहे. भारताचा अक्साई चीन (सुमारे 38,000 चौरस किमी क्षेत्र) चीनच्या ताब्यात होता. हा भाग दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा राहिला आहे. रेल्वे तंत्रज्ञानाने आपल्या अहवालात सांगितले आहे की, तिबेटची 'मध्यम ते दीर्घकालीन रेल्वे योजना' 2025 पर्यंत TAR रेल्वे नेटवर्कचे सध्याच्या 1,400 किमीवरून 4,000 किमीपर्यंत विस्तार करण्यास मदत करेल. तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) सरकारने जारी केलेल्या नवीन रेल्वे योजनेत हे उघड झालं आहे.
भारत आणि नेपाळच्या सीमा रेल्वेने जोडण्याचा चीनचा प्रयत्न
मिळालेल्या अहवालानुसार, चीनच्या या नव्या प्रकल्पामध्ये भारत आणि नेपाळपासून चीनच्या सीमेपर्यंत नवीन रेल्वेमार्गांचा समावेश असेल. हा नवीन रेल्वे मार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होईल आणि वायव्येकडील नेपाळ सीमेजवळून जाईल. यापुढे अक्साई चिनच्या उत्तरेतून जाऊन शिनजियांगमधील होटन येथे संपेल.
रेल्वे विस्ताराची चीनची तयारी
सध्या चीन भारत आणि नेपाळ सीमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याची तयारी करत आहे. रेल्वे तंत्रज्ञानाच्या रिपोर्टनुसार, चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) सरकारला TAR चे रेल्वेचं जाळं 4,000 किमीपर्यंत वाढवायचं आहे. सध्या हे जाळं 1,400 किमीपर्यंत पसरलेलं आहे. भारत-नेपाळ सीमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याची चीनची जोरदार तयारी सुरू आहे. तिबेटमध्ये स्वायत्त सरकार आहे असे चीन म्हणत असलं तरीही हे सरकार चीनच्या इशाऱ्यावर चालते. त्यामुळे रेल्वे विस्ताराचं हे पाऊल भारतासाठी चिंताजनक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :