चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश
चीनमध्ये (China Corona) कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिनपिंग सरकारने दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेनझेन शहरात आजपासून कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे.
![चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश China Coronavius Lockdown china imposed lockdown in three cities due to incerasing number of covid 19 चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/169f932bc2b8a204c773ac13ec756d01_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
China Lockdown : कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिनपिंग सरकारने दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेनझेन शहरात आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील तब्बल 1,70,00,000 नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
चीनमधील तीन शहरात लॉकडाऊन
दरम्यान चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील 90 लाख नागरिकांना एमर्ज्नसी अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेडोंगमधील युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. युचेंगमध्ये 5 लाख नागरिक राहतात. सध्या चीनच्या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे 2,65,00,000 नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हांगकांगमध्ये 27,647 कोरोनाबाधित
शेनझेन शहरात चीनच्या हुवावे (Huawei) आणि टेनसेंट या कंपन्याचे प्रमुख कार्यालय आहे. शेनझेन शहर हांगकांग शहराला लागून आहे. हांगकांगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. हांगकांग शहरात 27,647 कोरोनाबाधित असून 87 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 3,729 झाली आहे.
चीनमध्ये नोंदवली जाणारी कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक नोंद आहे.. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं याबाबत माहिती दिली चीनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये दोन हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
जगाचा आकडाही वाढताच, 24 तासांत 13 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद
जगभरात (World Corona Update) कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत जगात 13 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3579 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, चीनमध्ये 3100 रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 2 वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. दिवसागणिक झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं चीनच्या शेनजेनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यासोबतच येथे राहणाऱ्या 1.7 कोटी लोक पुन्हा एकदा आपापल्या घरांमध्ये कैद झाले आहेत. तर, शांघाईमधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)