एक्स्प्लोर
'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
लंडन : डाळ आणि 'चना डाळ' हा भारतीयांच्या जेवणात सर्रास वापरण्यात येणारा पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आल्याचं कळतंय. या शब्दांसोबतच इतर 600 आणखी नवे शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत वाढवले जाणार आहेत.
वास्तविक, दर तीन महिन्यांनी ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत दैनंदिन जीवनपद्धती आणि शिक्षण त्या संबंधी नवे शब्द समाविष्ट केले जातात. त्यानुसारच नवे 600 शब्दांचा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, टेनिसमधील फोर्स्ट एरर forced error आणि बेगेल bagal आदी शब्दांचाही समावेश करण्यात आलाय. याशिवाय वॉक woke आणि post truth आदी शब्दांचाही यात समावेश करण्यात आलाय.
2016 मध्ये ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत post truth हा शब्द 'वर्ल्ड ऑफ दि इअर' म्हणून घोषित करण्यात आला होता. 'वर्ल्ड ऑफ द इअर' म्हणून घोषित केल्याने, त्याचा बोली भाषेतील वापर वाढला आहे. त्यामुळेच हा शब्द या वर्षी ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत समाविष्ट करण्यात आला.
दरम्यान, गेल्या वर्षी post truth सोबत woke या शब्दालाही 'वर्ल्ड ऑफ द इअर'साठी नामांकन दिलं होतं. याचा अर्थ वर्णभेद किंवा सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरोधात सतर्क राहणं असा होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement