एक्स्प्लोर

विमानात लगेज चार्ज चुकवण्यासाठी 'त्या'ने 10 कपडे घातले

रेयान विल्यम्स हा प्रवासी आईसलंडहून इंग्लंडला घरी निघाला होता. त्याच्याकडे निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान असल्यामुळे ब्रिटीश एअरलाईन्सने त्याला अडवलं.

रेजाविक, आईसलँड : विमान प्रवासात अतिरिक्त सामान झाल्यामुळे 'लगेज चार्ज' चुकवण्यासाठी एका प्रवाशाने अनोखी शक्कल लढवली. प्रवाशाने चक्क 10 टीशर्ट आणि 8 पँट एकावर एक घातले, मात्र प्रवाशाची ही आयडिया त्याच्याच अंगलट आली. विमानाने प्रवास करताना सामानाबाबत प्रत्येक एअरलाईन्सचे काटेकोर नियम असतात, याची माहिती विमान प्रवाशांना असेलच. जर विमान कंपनीने आखून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक वजनाचं सामान तुम्हाला न्यायचं असेल, तर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. रेयान विल्यम्स हा प्रवासी आईसलंडहून इंग्लंडला घरी निघाला होता. त्याच्याकडे निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान असल्यामुळे ब्रिटीश एअरलाईन्सने त्याला अडवलं. अतिरिक्त सामानासाठी वेगळी बॅग घ्यावी लागेल आणि त्यांचे वेगळे पैसेही द्यावे लागतील, असं रेयानला सांगण्यात आलं. रेयानकडे एक्स्ट्रा लगेजसाठी 125 डॉलर (अंदाजे 8 हजार रुपये) नव्हते. त्यामुळे जास्तीचे कपडे त्याने एकावर एक घालायचं ठरवलं. रेयानने तब्बल 10 टीशर्ट आणि 8 पँट्स एकाच वेळी घातल्या आणि फ्लाईटमध्ये शिरत होता. आधी आपल्याला विमानात चढण्याची परवानगी दिली, मात्र नंतर ब्रिटीश एअरलाईन्सने मज्जाव केला, असा दावा रेयानने केला आहे. रेयानने गैरवर्तन केल्यामुळे त्याला बोर्डिंग पास न दिल्याचं स्थानिक मीडियाने म्हटलं आहे. रेयानने स्वतः या घटनेचा व्हिडिओ काढून शेअर केला आहे. अखेर इझीजेटच्या विमानाने प्रवास करण्याचा प्रयत्न रेयानने केला. मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशा पडली. अखेर तिसऱ्या एअरलाईन्सची फ्लाईट पकडून रेयान रवाना झाला. मात्र त्याच्या लगेज आणि कपड्यांचं काय झालं, हे समजलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget