एक्स्प्लोर

Liz Truss : अवघ्या दीड महिन्यात ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन पुन्हा शर्यतीत

Britain Political Crisis : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन आहेत.

Britain New PM : अवघ्या 45 दिवसांच्या सरकारनंतर ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि बोरिस जॉन्सन (Borris Johnson) आहेत. लिझ ट्रस सध्या काळजीवाहू पंतप्रधान असतील. लिझ ट्रस यांनी राजीनामा देत म्हटलं आहे की, पक्षाने केलेला जनादेश पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने आपण राजीनामा देत आहे. फसलेली कर रचना आणि वाढती महागाई यामुळे लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. तसेच लिझ ट्रस सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन शर्यतीत

कंझर्व्हेटिव्ह पक्षात लिझ ट्रस यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोघे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ ट्रस माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जवळच्या मानल्या जातात. 28 ऑक्‍टोबरपर्यंतच्या अंतर्गत निवडणुकीच्या आधारे नवीन पंतप्रधानाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, या काळात ब्रिटन सरकार आणि सरकारी तिजोरीवर आणखी भार वाढणार आहे. त्याआधी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला. शिवाय लिझ ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती.

'या' कारणामुळे लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लिझ ट्रस यांनी मिनी बजेट सादर करत नवीन कर रचना लागू केली होती. या नवीन कर रचनेला खासदारांनी ही विरोध केला होता. ही कर रचना आणि मिनी बजेट फसलं. ब्रिटनमध्ये महागाईचं संकट आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशात लिझ ट्रस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी त्यांच्याच पक्षाकडून दबाब होता. त्यामुळे अखेरीस त्यांनी गुरुवारी राजीनामा दिला. विशेष म्हणजे एक दिवस आधीच त्यांनी म्हटलं होतं की, 'मी हार मानणार नाही, मी राजीनामा देणार नाही.' या वक्तव्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांनी राजीनामा दिला.

नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रस काळजीवाहू पंतप्रधान

नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रस काळजीवाहू पंतप्रधान असतील. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना, लिझ ट्रस यांनी कबूल केले की, 'आपला जनादेश पूर्ण करण्यास आपण सक्षम नाही आणि म्हणूनच मी राजीनामा देत आहे.' तसेच, पुढील एका आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन पंतप्रधानाची निवड करेल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या परिस्थितीवर टीका करत ही लाजिरवाणी परिस्थिती असल्याचे सांगत तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget