Britain PM Race: 'मला ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारायची आहे', ऋषी सुनक लढणार पंतप्रधानपदासाठीची निवडणूक
Britain Next PM: ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Britain Next PM: ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना ते म्हणाले आहेत की, मला ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारायची आहे. पक्षात पुन्हा एकटा निर्माण करायची आहे आणि देशासाठी काहीतरी करायचे आहे. म्हणून निवडणुकीत पंतप्रधान होण्यासाठी मी उभा आहे, असं ते म्हणाले होते.
ऋषी सुनक यांनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिझ ट्रस नंतर सुनक यांना दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळाली होती. लिझ ट्रस कर रचनेत सुधारणांचे आश्वासन देऊन सत्तेवर आल्या. परंतु त्यांच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसला. याचाच परिणाम म्हणून लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. ऋषी सुनकच ब्रिटनचे पंतप्रधान होणार, असं म्हणत त्यांच्या नावावर सट्टा लावला जात असल्याचं तेथील माध्यमांचं म्हणणं आहे.
The United Kingdom is a great country but we face a profound economic crisis.
— Rishi Sunak (@RishiSunak) October 23, 2022
That’s why I am standing to be Leader of the Conservative Party and your next Prime Minister.
I want to fix our economy, unite our Party and deliver for our country. pic.twitter.com/BppG9CytAK
सुनक यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?
ऋषी सुनक यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, "युनायटेड किंगडम हा एक महान देश आहे, परंतु आपण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहोत. आपचा पक्ष आता ज्याची जीवदान करणार, आता ते ठरवेल की ब्रिटिश लोकांच्या पुढच्या पिढीला पूर्वीपेक्षा जास्त संधी मिळाला हवी. म्हणूनच मी तुमचा पुढचा पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता म्हणून उभा आहे. मला आपली अर्थव्यवस्था ठीक करायची आहे, पक्ष एकजूट करायचा आहे आणि देशासाठी काहीतरी करायचे आहे.''
सुनकने पुढे लिहिले आहे की, "मी तुमचा चान्सलर म्हणून काम केले आहे, सर्वात कठीण काळात आपली अर्थव्यवस्था चालवण्यास मदत केली. सध्या आपल्यासमोर असलेली आव्हाने खूप मोठी आहेत. परंतु आपण योग्य निर्णय घेतल्यास संधी अभूतपूर्व असतील.''
इतर महत्वाच्या बातम्या: