एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : अपंगांसाठी आरक्षित पार्किंगमध्ये कार लावल्याने 'गांधीगिरी'
ब्रासिलिया (ब्राझिल): अपंगांसाठी आरक्षित पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करणं एका तरुणाला आयुष्यभराचा धडा देणारं ठरलं आहे. तरुणाला शरम आणण्यासाठी पार्क केलेल्या गाडीभर निळे स्टिकर्स चिकटवण्यात आले.
अपंगांसाठी आरक्षित असलेला पार्किंग लॉट रिकामा असला, तरी तिथे कार पार्किंग न करणं शिष्टसंमत आहे. ब्राझिलमधल्या एका तरुणाने असाच आरक्षित लॉट रिकामा असल्याने बिनदिक्कत आपली गाडी तिथे पार्क केली आणि तो आपल्या कामासाठी निघून गेला.
गांधीगिरीची पद्धत म्हणावं अशाप्रकारे काही जणांनी येऊन त्याच्या कारभर निळे स्टिक बिल्स चिकटवले. त्यावर पांढऱ्या रंगात अपंगाचं चिन्ह असलेली व्हिलचेअरची आकृतीही तयार करण्यात आली. या सर्व घटनेचं काही जणांनी व्हिडिओ चित्रणही केलं.
हा प्रकार घडताना ट्राफिक पोलिसही त्या ठिकाणी हजर झाले. मात्र उपस्थितांनी वाहनचालकांना शरम आणण्यासाठी लढवलेली ही शक्कल पाहून तेही अवाक झाले. दंडाची रक्कम उकळण्यापेक्षा जन्मभराची अद्दल घडवण्याचा पर्याय पोलिसांना पटला असावा.
हा प्रकार सुरु असतानाच गाडीचा मालक तिथे परतला. गाडीवर केलेली 'कलाकुसर' पाहून तो पुरता हैराण झाला. वैतागून गाडीवरील स्टिकर्स फाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सहजासहजी यश आलं नाही. अखेर गाडी चालवण्यापुरती काचेवरील जागा आणि साईड विंडो रिकामी करुन त्याने गाडी सुसाट पळवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement