एक्स्प्लोर

Married To Pakistani Girl: प्रेमासाठी पठ्ठ्याने ओलांडली सीमा; पाकिस्तानमधील मुलीशी केला विवाह

Married To Pakistani Girl: दोन्ही देशातील शत्रूत्व बाजूला ठेवत एका भारतीय नागरिकाने पाकिस्तानातील सुक्कूरमध्ये जाऊन एका तरुणीशी विवाह केला आहे.

Married To Pakistani Girl: प्रेमात (Love) आणि युद्धात (War) सगळं काही माफ असतं हे आपण अनेकदा ऐकले असेल. हाच विचार करत अनेक तरुण तरुणी प्रेमात सर्वस्व वाहून देतात. मग घरच्यांची संमती नसेल तर पळून जाऊन लग्न करणे वैगरे गोष्टींचा अवलंब ही प्रेमयुगुलं करतात. तर काही मुलं आणि मुली परदेशातील (Aborad) आपल्या वयाच्या मुलाला किंवा मुलीला आपला जीवनसाथी (Lifepartner) म्हणून निवडतात. मग त्यात राहण्यापासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत सगळे बदल होतात. 

असंच मुंबईतील (Mumbai) एका तरुणाचे लग्न देखील सध्या असाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने परदेशातील तरुणीशी नव्हे तर पाकिस्तानातल्या (Pakistan) एका तरुणीशी विवाह केला आहे. त्यामुळे प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं हे अगदी खरं केलं आहे. 

वृत्तानुसार, मुंबईत राहत असलेल्या महेंद्र कुमार या तरुणाने पाकिस्तानाचे नागरिकत्व असलेल्या संजुगाता कुमारीसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय घेतला आणि  तिच्याही विवाह करण्यासाठी तो कुटुंबासोबत थेट पाकिस्तानातील सुक्कुरमध्ये गेला. हा विवाह सोहळा सुक्कुमधील एका हॉलमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याला या जोडप्याचे काही नातेवाईक आणि पाकिस्तानातील हिंदू समाजातील लोकं उपस्थित होते. तसेच त्यांनी घेतलेला हा निर्णय चांगला असून त्यांच्या आनंदात सामील असल्याचं दोघांच्याही नातेवाईकांनी सांगितलं.   

संजुगाताच्या आईवडिलांनी सांगितले की, 'महेंद्र आणि संजुगाता दोघांची सोशल मिडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले'. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दोन्ही कुटुंबांनी मुलांच्या आनंदात सहभागी होत या लग्नाला परवानगी दिली. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांशी संपर्क साधला. त्याद्वारे त्यांनी लग्नाबाबतचे निर्णय घेतले. 

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येणार भारतात

दोन्ही देशांतील नियमांचा विचार करता बरीच कायदेशीर प्रक्रिया या दाम्पत्याला पूर्ण करावी लागणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या सुरक्षिततेचा विचार करता या कायदेशीर बाबी पूर्ण करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन संजुगाता आपल्या पतीसह काही दिवसांतच भारतात परत येतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget