एक्स्प्लोर

Bomb Cyclone: अमेरिका गारठली, - 48 डिग्री तापमान, हिमवादळामुळे 18 जणांचा मृत्यू

Bomb Cyclone: या चक्रीवदळामुळे आतापर्यंत 18 जणांना आपला जीव गमावावा लागलाय. तर 18 लाखांपेक्षा जास्त लोक घरात अडकले आहेत.

Bomb Cyclone: अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे अमेरिकामध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. अमेरिकेत आलेल्या या  हिमवादळामुळे आतापर्यंत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. या हिमवादळामुळे शुक्रवारी हजारो विमानांची उड्डाणं रद्द झाली होती. 

अमेरिकामधील सध्याचं तापमान - 48 डिग्रीपर्यंत घसरलं आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  हिमवादळामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालं आहे. गाड्यांचे अपघात, झाडे कोसळणे, यासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. अमेरिकेत आलेलं हिमवादळ हे बम चक्रीवादळ आहे. या चक्रीवदळामुळे आतापर्यंत 18 जणांना आपला जीव गमावावा लागलाय. तर 18 लाखांपेक्षा जास्त लोक घरात अडकले आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे विमानतळावरच हजारो नागरिक अडकले आहेत. 

आणखी चार दिवस निचांकी तापमान -

अमेरिकीत अनेक शहरातील तापमान - 48 डिग्रीपर्यंत घसरलं आहे. अनेक ठिकाणी हिमवादळामुळे बर्फवृष्टी होत आहे.  सिशीगन आणि पेनसिल्हेनियामध्ये पुढील काही दिवसांत आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी समुद्रातील पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवस अमेरिकेत निचांकी तापमान राहण्याची शक्यता तेथील हवामान विभागानं वर्तवली आहे.

मेडिकल टीम न पोहचल्यामुळे मृत्यू - 

हिमवादळामुळे अमेरिकेत सर्व काही ठप्प आहे. जनजिवन विस्कळीत झालेय. सर्वजण घरातच आहेत. आपतकालीन परिस्थितीतही लोक मदत करु शकत नाहीत. न्यूयॉर्कमधील बफैलो परिसरात तीन जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये दोन जणांचा घरातच मृत्यू झालाय. या दोघांची प्रकृती खराब झाली होती. पण हिमवादळामुळे मेडिकल पथक उपचारासाठी न पोहचल्यामुळे त्यांना जीव गमावावा लागला.  अमेरिकेच्या राष्ट्रीय वेदर सर्व्हिसनुसार, अमेरिकेत अनेक ठिकाणाचं तापमान -48 डिग्रीपर्यंत पोहचलेय. 

न्यूयॉर्कच्या गवर्नर काय म्हणाल्या?

न्यूयॉर्कच्या गवर्नर कॅथी होचुल यांनी राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, निसर्गाचा हा प्रकोप भयंकर आहे. सर्व काही कठीण आहे.  हिमवादळात हवेचा वेग 80 मील प्रति तास इतका आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. 

विमानतळावर काय स्थिती ?

न्यूज एजन्सी शिन्हुआच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिकेतील विमानतळावर अनेक नागरिक अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.  अमेरिकेतील सर्वात मोठं राज्य  वॉशिंगटनमधील सिएटल विमानतळावरील 449 फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अन्य देशातून अथवा राज्यातून येणाऱ्या फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'D Gukesh World Chess Championship :  डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
Embed widget