एक्स्प्लोर

एक व्यथा अशीही... तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!

43 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येताच त्याने सर्वात आधी आईच्या कबरीजवळ जाऊन तिचं दर्शन घेतलं. कारण न केलेल्या गुन्ह्यात अडकल्याने तो आईचे अंतिम दर्शनही घेऊ शकला नव्हता...

मुंबई : न्यायव्यवस्थेतील एक गोष्ट किंवा वाक्य अनेक सिनेमांतून किंवा पुस्तकातून समोर येत असतं. ते म्हणजे '100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये.' पण याच वाक्याच्या अगदी उलट गोष्ट युनायटेड स्टेट्समधील मिसूरी (Missouri) राज्यात घडली आहे. मिसूरीतील केविन स्ट्रिकलँड (Kevin Strickland) नामक एका व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी 43 वर्षे तुरुंगात राहावं लागलं असून इतक्या वर्षानंतर आता त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. 

3 व्यक्तींच्या हत्येच्या प्रकरणार तुरुंगात अडकलेल्या केविनने तुरुंगातून बाहेर पडताच सर्वात आधी आईच्या कबरीपाशी जाऊन त्याचे दर्शन घेतले आहेत. कारण न केलेल्या गुन्ह्यात अडकल्याने तो आईचे अंतिम दर्शनही घेऊ शकला नव्हता. एखाद्या सिनेमासारखं कथानक केविनच्या जीवनात घडल्याचं आता समोर आलं आहे. तर नेमका हा सर्व प्रकार काय आहे? हे असं का झालं? आणि आता कशी केविनची निर्दोष मुक्तता झाली हे सारं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

नेमकं प्रकरण काय?

तर हे सर्व प्रकरण आहे 43 वर्षांपूर्वी अर्थात 1978 साली घडलेलं. 25 एप्रिल, 1978 रोजी मिसूरी येथील कन्सास शहरात (Kansas City) घडलेल्या एका तिहेरी हत्याकांडात केविन याला दोषी ठरवत तुरुंगात धाडण्यात आलं. यावेळी  शेरी ब्लॅक (22), लॅरी इनग्राम (21) आणि जॉन वॉल्कर (20) या 3 व्यक्तींची हत्या झाली होती. ज्यामध्ये त्यावेळी या हल्ल्यातून बचावलेल्या सिंथिया डगलस (Cynthia Douglas) या प्रत्यक्षदर्शी महिलेच्या साक्षीने केविन याला दोषी ठरवण्यात आलं होतं.  त्याला किमान 50 वर्षे पॅरोलवर बाहेर पडता येणार नाही अशी शिक्षा कोर्टाने सुनावली होती. या गुन्ह्यात पुढे जाऊन व्हिन्सेंट बेल आणि किल्म अॅडकिन्स यांनाही 1979 मध्ये त्यांच्या हत्येतील भूमिकांसाठी दोषी ठरवण्यात आलं. 

दरम्यान हल्ल्यात बचावलेल्या सिंथियाला पायाला आणि हाताला गोळी लागल्याने तिच्यावरही उपचार करण्यात आले. ज्यातून सावरल्यानंतर 2009 मध्ये तिला आपण चुकीच्या व्यक्तीचं नाव घेतलं असल्याचं जाणवलं. ज्यानंतर तिने केविनचं नाव चूकीने घेतल्याचा एक मेल मि़डवेस्ट येथील निर्दोष गुन्हेगारांसाठी काम करणाऱ्या ( Midwest Innocence Project) संस्थेला पाठवला. ज्यानंतर पुढे चौकशी झाल्यानंतर गुन्ह्यातील इतर दोन दोषी व्हिन्सेंट बेल आणि किल्म अॅडकिन्स यांनीही केविन आपल्यासोबत नसल्याचं मान्य केलं. ज्यामुळे अखेर मंगळवारी (23 नोव्हेंबर) केविनची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

केविनला मदतीची गरज

तुरुंगातून सुटका होताच सर्वात आधी केविन त्याच्या आईच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला. कारण तुरुंगात असल्यामुळे केविनची आई वारली असताना त्याला तिचे अंतिम दर्शनही घेता आले नव्हते. दरम्यान त्यानंतर केविन त्याच्या वकिलांसह आणि निकटवर्तीयांसह जेवणासाठी बाहेर गेला. दरम्यान केविनची वकिल रोजो बोनशेल यांनी या सर्वानंतर केविनला किमान शासनाकडून काही मदत मिळायला हवी अशी मागणीही केली आहे.

हे ही वाचा

Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा

महिला कलाकार असलेल्या कार्यक्रमावर बंदी, महिला पत्रकारांनीही हिजाब परिधान करणं बंधनकारक; तालिबान सरकारचे आदेश

महिला कलाकार असलेल्या कार्यक्रमावर बंदी, महिला पत्रकारांनीही हिजाब परिधान करणं बंधनकारक; तालिबान सरकारचे आदेश

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget