एक्स्प्लोर
अहमदाबाद-लंडन विमानाला पक्ष्याची धडक, विमानाचंच नुकसान
लंडन : अहमदाबाद-लंडन ते नेवॉर्क असा प्रवास करणाऱ्या विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने चक्क विमानालाच नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
अहमदाबादवरुन एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलं. मात्र उड्डाणावेळीच विमानाच्या पुढच्या टोकदार भागावर पक्षी आदळला. मात्र जेव्हा हे विमान लंडनला उतरलं, तेव्हा धडक बसलेल्या ठिकाणाचा भाग पूर्णपणे दाबला गेला असल्याचं लक्षात आलं.
विमानाचं नुकसान झाल्यामुळे पुढे नेवॉर्कला जाणारं हे विमान लंडनलाच रद्द करण्यात आलं. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र एका छोटया पक्ष्याच्या धडकेने विमानाचं नुकसान कसं झालं, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
वाऱ्याच्या प्रचंड वेगात अतिशय छोटी वस्तू जरी विमानावर आदळली, तरी अशा प्रकाराचं नुकसान होऊ शकतं, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement