एक्स्प्लोर
भारताला विशेष दर्जा देण्यास अमेरिकन सिनेटचा नकार
वॉशिंग्टन डीसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारतासाठी निराशादायक बातमी आहे. कारण अमेरिकन सिनेटने भारताला विशेष दर्जा देण्यास नकार दिला आहे. अमेरिका आणि भारत 'जागतिक संरक्षण आणि धोरणांमध्ये भागीदारी' यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये ठराव पास न झाल्यामुळे भारताचा समावेश नाकारण्यात आला, असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या विरोधी रिपब्लीकन पक्षाचे सीनेटर जॉन मॅकिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण कायद्याअंतर्गत हा प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावर चर्चा न झाल्याने जॉन यांनी नाराजी व्यक्त केली.
काय होता सिनेट प्रस्ताव?
अमेरिकन सिनेटमध्ये भारताचा समावेश झाल्यानंतर भारताला अमेरिकन सिनेटमध्ये विशेष दर्जा मिळणार होता. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन सिनेटला संबोधित केल्यानंतर जागतिक धोरणं आणि सुरक्षेच्या भागीदारीसाठी भारताचा अमेरिकन सिनेटमध्ये समावेश करण्यात यावा, अशी ओबामा यांना विनंती केली होती.
दहशतवाद, सुरक्षा आणि धार्मिक देवाणघेवाण या मुद्यांवर भारत आणि अमेरिकेने मिळून धोरणं बनवण्याचा या प्रस्तावामध्ये समावेश होता. भारताला विशेष दर्जा देऊन अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय सैन्यासाठी प्रशिक्षण, पायरसी रोखणं, अशा मुद्यांसाठी अमेरिकेने सहकार्य करण्याची विनंती मोदी यांनी ओबामांना केली होती.
सिनेटमध्ये प्रस्तावावर व्यवस्थित चर्चा न झाल्यामुळे हा प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. एक व्यक्ती विकास साधू शकत नाही, त्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे. भारत आणि अमेरिका गेल्या 20 वर्षांपासून संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण चर्चेअभावी हा प्रस्ताव मान्य झाला नाही, असं जॉन मॉकिन यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement