(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी: श्रीलंका सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी
Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत.
Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.
या घटनेची कबुली देताना श्रीलंका पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या निदर्शनादरम्यान जमावाला हिंसक वळण लागलं आणि ते पोलिसांवर दगडफेक करू लागल्याने गोळीबार करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत तेलाची तीव्र टंचाई आणि त्याच्या वाढलेल्या किंमतींच्या निषेधार्थ राजधानी कोलंबोपासून 95 किमी अंतरावर असलेल्या मध्य श्रीलंकेच्या रामबुकाना येथे लोकांनी महामार्ग रोखला.
श्रीलंकेच्या इंधन कंपन्यांनी तेलाच्या दरात केली वाढ
रामबुकाना येथे महामार्ग ठप्प झाल्यामुळे तेथे निदर्शने सुरू झाली. या घटनेच्या निषेधार्थ तेथे टायर जाळण्यात आले. श्रीलंकेची सरकारी तेल कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC) ने सोमवारी मध्यरात्रीपासून इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी इंडियन ऑइलच्या स्थानिक ऑपरेशन्सने दरवाढीची घोषणा केली होती.
महिन्याभरात दोनदा वाढली किंमत
दरम्यान, श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना CPC ने 92 ऑक्टेन पेट्रोलची किंमत 84 रुपयांनी वाढवून 338 रुपये प्रति लीटर केली आहे. ही किंमत आता श्रीलंकन इंडियन ऑइल कंपनी (LIOC) च्या प्रति लिटर किमतीएवढी झाली आहे. CPC ने एका महिन्यात दोनदा किंमत वाढवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पाकिस्तानचा अफगाणिस्तानावर 'Air Strike', 47 जण ठार, मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश
कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करून बर्थ डे पार्टी; पोलिसांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना ठोठावला दंड
Amway Money Laundering : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण
Amarnath : अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट, टीआरएफ संघटनेची धमकी