जशास तसं, Zoom वरुन 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, आता कंपनीनेही CEO ला धडा शिकवला!
900 Employees fires : झूम मिटिंगवरुम (Zoom Meeting) तब्बल 900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या सीईओ विशाल गर्ग यांना कंपनीने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे
900 Employees fires : झूम मिटिंगवरुम (Zoom Meeting) तब्बल 900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या सीईओ विशाल गर्ग यांना कंपनीने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गेल्या आठवड्यात Better.com कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी झूम मिटिंगवरुन 900 जणांना नोकरीवरुन काढल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर गर्ग यांनी आपला माफीनामाही जाहीर केला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गर्ग यांना कंपनीने सक्तीच्या सुट्टीवर पाठवलेय. त्यांच्या जागी चीफ फायनांशिअल अधिकारी Kevin Ryan कंपनीचे सर्व काम पाहणार आहेत.
मागील आठवड्यात विशाल गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम मिटिंगद्वारे तब्बल 900 लोकांना नोकरीवरुन काढलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर कंपनी आणि विशाल याच्यावर जगभरातून टीका झाली होती. विशाल गर्ग यांना सोशल मीडियावर खडूस बॉस म्हणून म्हटलं गेलं. या सर्व प्रकरानंतर कंपनीने विशाल यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीची सर्व जबाबादारी सध्या Kevin Ryan यांच्याकडे सोपवली आहे. या सर्व प्रकरणावर Better.com या कंपनीकडून अधिकृत कोणतीही माहिती आलेली नाही.
अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांनी ज्या पद्धतीने 900 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली. आता विशाल गर्ग यांना याबाबत माफीही मागितली. 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करायचं की नाही? याबाबत कंपनीने कोणतीही सूचना अथवा इशारा दिला नव्हता. Better.com या कंपनीमध्ये जपानमधील एक सॉफ्ट बँकेची गुंतवणूक आहे. सध्या या कंपनीचे बाजारमूल्य 7 अब्ज डॉलर इतके आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल -
कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही, मात्र झूम कॉलद्वारे 900 लोकांना नोकरीवरून कमी करण्याती पहिलीच वेळ आहे. सीईओ विशाल गर्ग यांनी बैठकीत कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप केला. तुम्ही लोक फक्त दोन तास काम करतात, कंपनीच्या व्यवसायात, कामात कोणतेही योगदान देत नसल्याचे त्यांनी म्हटले. या झूम कॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे विशाल गर्ग यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली.
विशाल गर्ग यांचा माफीनामा -
900 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर विशाल गर्ग यांनी जाहीर माफी मागितली. ते म्हणाले की, ''आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती देताना आपण मोठी चूक केली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याती पद्दत चुकीची होती. या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांवरील कठीण प्रसंगात आणखी भर पडली. अशा पद्धतीने कर्कामचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याचे सांगणे चुकीचे होते.''
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live