Trending Video : चिमुकल्याची सर्फिंग पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, थक्क करणारा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चिमुकला पाण्यात सर्फिंग करताना दिसत आहे.
Trending Video : सर्फिंग (Surfing) हा एक साहसी खेळांमधील प्रसिद्ध प्रकार आहे. अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक असे सर्फिंग आणि स्टंटचे आजपर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक वेळा सोशल मीडियावर भन्नाट वॉटर संट्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्यो मोठ्या माणसांऐवजी एक चिमुका पाण्यात सर्फिंग करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा पाण्यात सर्फिंगचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरंच थक्क करणारा आहे. सर्फिंग करतानाचा या चिमुकल्याचा आत्मविश्वास पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. व्हि़डीओ पाहून हा चिमुकला नुकताच चालायला लागला असावा असे दिसून येते.
ज्या वयात मुलांना नीट चालायला ही येत नाही, अशावेळी हा चिमुकला पाण्यात वेगाने सर्फिंग करताना दिसत आहे. यावेळी बोटीमध्ये असणारा व्यक्ती चिमुकल्याला सर्फिंगसाठी मदत करताना व्हिडीओत दिसून येतं. व्हिडीओतील चिमुकल्याचा आत्मविश्वास पाहून त्यानं सर्फिंग करण्याची ही पहिलीचं वेळ नसावी, असंही दिलून येतंय.
Aweeeeee little big surfer! ❤️😂😂pic.twitter.com/apWQhCLetx
— Figen (@TheFigen) May 25, 2022
हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या 22 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये हा चिमुकला सर्फ बोर्डवर उभा आहे. त्याच्या बचावासाठी त्याला लाईफसेविंग जॅकेट घातलेलं दिसत आहे. तसेच त्याला सेफ्टी बेल्टही लावण्यात आला आहे. यावेळी एक व्यक्ती चिमुकल्याला सर्फिंगसाठी मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि शेअर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Viral Video : वाघिणीच्या बछड्यांचं पालन करतोय कुत्रा, थक्क करणारा व्हिडीओ मन जिंकेल
-
Viral Video : गादीवर झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाचे नखरे एकदा पाहाच, तुम्हीही प्रेमात पडाल
- Trending Video : तलावावर एकत्र पाणी पिण्यासाठी पोहोचले बिबट्या आणि हरिण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा