Sunita Williams: 150 प्रयोग, 9 वेळा स्पेसवॉक...; सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिने काय काय केले?, नासाने सर्व सांगितले!
Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे 9 महिने राहिले.

Sunita Williams Return: नासाच्या (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील त्यांच्यासोबत होते. हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरले. तिथून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना बाहेर काढले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे 9 महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले?, याबाबत नासाने माहिती दिली आहे.
Next, teams will lift the craft onto the recovery ship and open the hatch, a process expected to take 30-60 minutes.
— NASA (@NASA) March 18, 2025
सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या-
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना 9 महिने तिथे थांबावे लागले. या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिने काय काय केले?
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.
























