एक्स्प्लोर

Lebanon Migrant Boat : लेबनॉन बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 61 वर पोहोचली, अजूनही शोधमोहीम सुरुच

Lebanon Migrant Boat : लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे.

Lebanon Migrant Boat : लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनचे परिवहन मंत्र्यांनी आज याबाबत माहिती दिली.  दरम्यान, सीरियन सरकारने यापूर्वी सांगितले होते, की टार्टोसमधील बासेल रुग्णालयात वाचलेल्या 20 जणांवर उपचार सुरू आहेत. सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये दोन गर्भवती महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याचे त्यात म्हटले आहे.

सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी लेबनॉनच्या उत्तर मिन्येह प्रदेशातून 120 ते 150 च्या लोकांसह निघाली होती. सीरियन बंदरांचे महासंचालक समेर कुब्रुस्ली यांनी सांगितले की, शुक्रवारी शोध मोहीम सुरू होती. समुद्रातील खराब वातावरणामुळे तसेच जोरदार वाऱ्याने बचावकार्य कठीण झाले होते, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते.

लेबनॉन आर्थिक मंदीच्या गर्तेत, जीव धोक्यात घालून स्थलांतर सुरु 

लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींनी संकटग्रस्त लेबनॉनमधून समुद्रमार्गे युरोपला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने ही भयंकर घटन घडली आहे. एकट्या लेबनॉनमध्ये हजारो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि लेबनीज पाउंडने त्याचे मूल्य 90 टक्क्यांहून अधिक घसरले आहे, ज्यामुळे हजारो कुटुंबे संकटात आल्याने अत्यंत गरीबीत जगत आहेत.

दरम्यान,  टार्टसचे गव्हर्नर अब्दुलहलीम खलील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या गंभीर दुर्घटनेतून वाचलेल्यांची भेट घेतली. जहाजात किती लोक होते आणि ते नेमके कोठे जात होते हे स्पष्ट झालेलं नाही, परंतु कोस्टगार्ड अजूनही मृतदेह शोधत आहे.सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, या बोटीत वेगवेगळ्या देशांमधील लोक होते. युरोपमध्ये संधी शोधण्यासाठी गेल्या काही महिन्यांत हजारो लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींनी बोटीतून लेबनॉन सोडले आहे. 

बोट दुर्घटना, वर्षातील दुसरी घटना 

लेबनॉनची लोकसंख्या साठ लाख आहे. ज्यामध्ये 10 लाख सीरियन निर्वासितांचा समावेश आहे. 2019 च्या उत्तरार्धापासून गंभीर आर्थिक मंदीच्या गर्तेत आहे. ज्यामुळे तीन चतुर्थांश लोकसंख्या दारिद्र्यात खेचली गेली आहे. एप्रिलमध्ये, डझनभर लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींना समुद्रमार्गे इटलीला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करणारी एक बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती. या घटनेत डझनभर ठार झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget