एक्स्प्लोर
अमेरिकेतील सर्वात उंच धरण फुटण्याची भीती, लाखो लोकांचं स्थलांतर
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामधील ओरोविलजवळील धरण धोकादायक स्थितीत आहे. ओरोविल धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1 लाख 30 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.
ओरोविल धरणाला भेगा पडल्याने उत्तर कॅलिफोर्नियातील प्रशासन सतर्क झाले आहे. धरण फुटल्यास जिथवर पाणी पोहोचू शकेल, अशा भागातील जवळपास 1 लाख 30 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.
धरण परिसरात भारतीयांची संख्या अधिक
ओरोविल धरणाच्या धोकादायक स्थितीमुळे स्थलांतर करण्यात आलेल्यांमध्ये भारतीय वंशाचे लोक अधिक आहेत. या भागात सीख लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
रॉयटर वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील यूबा शहरात ओरोविल धरणाच्या फुटण्याच्या भीतीमुळे 1 लाख 30 हजार लोकांना जवळील सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. धरणाच्या जवळील परिसरात 13 टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात.
अमेरिकेतील माध्यमांच्या माहितीनुसार, ओरोविल धरणाला मोठी भेग पडली असून, धरण तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणाची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने लोकांचं स्थलांतर करण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासही सुरुवात केली आहे.
ओरोविल धरणाचे वैशिष्ट्य
ओरोविल धरणं हे अमेरिकेतील सर्वात उंच धरण आहे. या धरणाची लांबी तब्बल 6,920 फूट, तर उंची तब्बल 770 फूट एवढी आहे. 1961 मध्ये ओरोविल धरणाच्या बांधमाकाला सुरुवात झाली होती, तर 4 मे 1968 रोजी उद्घाटन झालं. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस या धरणाची देखभाल करतं.
https://twitter.com/CStoreNews_/status/830977574012583937
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement