एक्स्प्लोर
रस्त्यावर पैशांचा पाऊस... पैशांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने लोकांची चंगळ
अटलांटामधील एका हायवेवरून एका डॉलर वाहून नेणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने सगळे डॉलर हवेत उडाले. हवेत उडालेले हे डॉलर सर्व रस्त्यावर पसरले आणि ते गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
जॉर्जिया : जर तुम्ही रस्त्यावरून प्रवास करत आहात आणि अचानक पैशांचा पाऊस सुरू झाला तर... ही कल्पनाच स्वप्नवत आहे. मात्र अशी घटना स्वप्नात नव्हे तर प्रत्यक्षात घडली आहे. अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांताची राजधानी अटलांटामध्ये एका हायवेवर पैशांचा (डॉलरचा) पाऊसच पाहायला मिळाला.
अटलांटामधील एका हायवेवरून एका डॉलर वाहून नेणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने सगळे डॉलर हवेत उडाले. हवेत उडालेले हे डॉलर सर्व रस्त्यावर पसरले आणि ते गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका गाडीतून अचानक नोटा हवेत उडून जमिनीवर पडू लागल्या. बराच वेळ त्या गाडीतील लोकांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. जोपर्यंत त्यांना ही गोष्ट कळली तोवर खूप सारे डॉलर हवेत उडाले होते. यावेळी रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांनी आपापल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावत डॉलर घेण्यासाठी धाव घेतली.
येथील डाउनवुड पोलिसांच्या मते, वाहनचालक आणि संबंधित लोकांच्या दुर्लक्षामुळे 175,000 म्हणजे जवळपास 1 कोटी 20 लाख हवेत उडाले. यापैकी जवळपास एक लाख डॉलर हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 75 हजार डॉलर घेऊन लोकांनी पोबारा केला आहे. पोलिसांकडून व्हिडीओ पाहून या ठिकाणी असलेल्या लोकांची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे. अनेक लोकांनी स्वतः डॉलर पोलिसांकडे जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Dunwoody Police tell me it is possible well over $100,000 in cash covered 285 West last night after a door on an armored truck came open. If you picked up any of the cash police are asking you to return it or you could be charged with theft. https://t.co/H5PaYx5nkP #11Alive pic.twitter.com/WY9gWzRj1n
— Joe Henke (@JoeHenke) July 10, 2019
पोलिसांनी सांगितले की, या रस्त्यावर गाडीतून पैसे उडून जाण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. 2004 साली एका गाडीचा अपघात झाल्यानंतर 1 कोटी 36 लाख रुपये चोरी झाले होते तर 2018 मध्ये अशाच प्रकारे गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने जवळपास 4 कोटी 11 लाख रुपये गायब केले होते.Dunwoody police tell me so far 2 people have returned money they picked up on 285 yesterday. One bag had approximately $600. The other has around $2100. Both people said they saw the department's post and it didn't sit well with them to keep the money. #11Alive pic.twitter.com/qtkEa1MV6e
— Joe Henke (@JoeHenke) July 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement