उड्डाणानंतर पालयटचा तातडीचा संदेश; दिल्लीकडे निघालेलं Air India चं विमान हाँगकाँगकडे परतलं
Air India: नुकतीच अहमदाबादमध्येही एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Air India Flight: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी मोठी विमान दूर्घटना घडली. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटाच्या आत दाट वस्ती असणाऱ्या वसतीगृहावर कोसळले. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानात काही तांत्रिक बिघाड झालाय का? हे तपासण्यात येत असताना आता एअर इंडियाचं हाँगकाँगहून दिल्लीला निघालेलं एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान (AI315) सोमवारी तांत्रिक बिघाडाच्या संशयावरून परत हाँगकाँगमध्ये उतरवण्यात आलं. विमानाने हाँगकाँगहून दिल्लीकडे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वैमानिकाला यंत्रणेत काहीतरी तांत्रिक अडचण जाणवली. संभाव्य धोका ओळखून वैमानिकाने तातडीनं निर्णय घेत विमान परत वळवले आणि हाँगकाँग विमानतळावर ते सुरक्षितरित्या उतरवले.
नेमकं झालं काय?
ही घटना सोमवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली. एअरपोर्ट अथॉरिटी हाँगकाँगच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं AI315 हे विमान हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आलं. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक यंत्रणांना स्टँडबायसाठी तयारीत राहण्यास सांगण्यात आलं होतं. हाँगकाँगहून येणारे एअर इंडियाचे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रवासी आणि पायलटसह केबिन क्रू सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना काही काळ अडथळा आणि गैरसोय झाली. मात्र एअर इंडियाकडून सर्व प्रवाशांना आवश्यक ती मदत दिली जात असल्याचं अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या काही काळात एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच अहमदाबादमध्येही एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
अहमदाबाद विमान अपघात
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात (passenger aircraft) कोसळलं आहे. एअर इंडियाचं (Air India) ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
हेही वाचा























