Afghanistan Crises : अफगाणिस्तानातून वेळेत सैन्य मागे घ्या, नाहीतर...; तालिबान्यांची अमेरिकेला धमकी
Afghanistan Crises : अफगाणिस्तानमध्ये सगळं आलबेल असल्याचा दावा करणाऱ्या तालिबान्यांनी आता थेट जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला धमकी दिली आहे.
Afghanistan Crises : अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता आली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. अशातच तालिबाननं अफगानिस्तानचा ताबा घेतला आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेताच, संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ताब्यात घेतलं. आता तालिबान्यांनी थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. तालिबाननं म्हटलं आहे की, जर बायडन सरकारनं अफगानिस्तानातून आपल्या सैनिकांना माघारी बोलावलं नाही, तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी म्हटलं की, "अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी 31 ऑगस्टपूर्वी अफगानिस्तानातून अमेरिकेचं सर्व सैन्य माघारी बोलावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन मागे हटू नये."
तालिबाननं स्पष्ट म्हटलं आहे की, 31 ऑगस्टनंतर एकही दिवसाची मुदत दिली जाणार नाही. जर 31 ऑगस्टनंतर एकाही दिवसाची मुदत अमेरिका आणि ब्रिटननं मागितली, तर त्याचं उत्तर आमच्याकडून दिलं जाईल आणि त्यासोबतच गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल.
अफगानिस्तानात तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर काबुल विमानतळावर भितीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. नागरिक तालिबान्यांपासून बचाव करण्यासाठी सर्व काही सोडून अफगानिस्तानातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत, यासंदर्भात तालिबानी प्रवक्ते सुहैल शाहीन यांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबतच्या गोष्टी फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, "मी तुम्हाला विश्वास देतो की, इथे अजिबात घाबरण्याची गरज नाही. त्या नागरिकांना पश्चिमी देशांमध्ये राहायचं आहे, कारण अफगाणिस्तान एक गरिब देश आहे. अफगानिस्तानातील 70 टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली येतात. त्यामुळे प्रत्येकाला पश्चिमी देशांमध्ये राहून एक समृद्ध जीवन जगायचं आहे."
दोन टीमचा 56 तासांचा थरार.. काबुलमध्ये तालिबानला चकवा देऊन 150 भारतीयांना मायदेशात आणलं
काबूलच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या, ज्यात एका टीममध्ये 46 लोक होते. त्यांना 16 ऑगस्टला आणण्यात आले होते. त्याचवेळी, दुसऱ्या टीममध्ये भारताचे राजदूत, 99 आयटीबीपी कमांडो, तीन महिला आणि दूतावास कर्मचारी यांचा समावेश होता. 17 ऑगस्ट रोजी सुमारे 150 लोकांना भारतात आणण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर पडण्याचा पहिला प्रयत्न 15 ऑगस्टलाच करण्यात आला, जेव्हा सर्वजण विमानतळाकडे रवाना झाले, पण तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेक पॉइंटवर एक सशस्त्र तालिबान दिसला, ज्यामुळे या टीमला 15 तारखेला दूतावासात परत यावे लागले.
16 ऑगस्ट रोजी पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि जेव्हा ते दुपारी 4 वाजता विमानतळाकडे निघाले तेव्हा दूतावासाच्या बाहेर तालिबान शस्त्रास्त्रांसह उभे होते. अशा स्थितीत विमानतळापासून 15 किमीचे अंतर कापण्याचे मोठे आव्हान होते.
अशा भितीच्या वातावरणात रात्री 10.30 वाजता टीम पुन्हा एअरबेसकडे रवाना झाली. सशस्त्र लोकांना चकवा देत, दुपारी 3.30 वाजता एअरबेसवर पोहोचले. या दरम्यान रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी होती आणि तालिबानी लोकांकडून प्रत्येक किलोमीटरवर बॅरिकेड लावून तपासणी केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासातून विमानतळावर लोकांना सुरक्षितपणे नेण्यासाठी सुमारे 14 बुलेटप्रूफ कारच्या ताफ्याचा वापर करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :